दिल्लीतील नरेला परिसरात असलेल्या एका फूड फॅक्टरीला शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. क्षणार्धात संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी आला. या घटनेत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
श्याम (२४ वर्षे), राम सिंग (३० वर्षे) बीरपाल (४२ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नरेला परिसरात एक फूड फॅक्ट्ररी आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास या कारखान्यात डाळ भाजण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली.
मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने काही कामगारांना वेळीच बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत या कामगारांना बाहेर काढलं. त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. इतर ६ कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात मूग डाळ भाजली जात होती. त्याचवेळी पाइपलाइनमधील गॅस गळतीमुळे अचानक आग लागली. कॉम्प्रेसर जास्त गरम होऊन त्याचा स्फोट झाला असावा. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.