Accident In Gujarat : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू

Gujarat Accident News : गुजरातच्या साबरकांठामध्ये वाढदिवसाच्या पार्टीवरून कुटुंबाचा अपघात झाल. कार आणि ट्रकच्या अपघाता एकाच कुटुंबातील चौघांचा मत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू
Akola AccidentSaam tv

गुजरात : गुजरातमध्ये वाढदिवसाच्या पार्टीवरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुजरातच्या साबरकांठा येथे ईडर-हिम्मतनगर महामार्गावर जवळ शुक्रवारी सकाळी कार आणि ट्रकमध्ये अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ७ महिन्यांच्या लहान मुलाचा समावेश आहे.

साबरकांठामध्ये झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघातात शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू
Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक; एकाच आधारकार्डावर तिघांचा प्रवेश, CISF कडून तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सर्व जण हिम्मतनगर येथून वाढदिवासाच्या पार्टीनंतर घरी परतत होते. यावेळी अपघाताची भीषण घटना घडली. या अपघातात एका ७ महिन्याच्या मुलीचाही मृत्यू झाला.

वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू
Yavatmal Accident: CRPF जवनांच्या ३ वाहनांना ट्रकची धडक, एका जवानाचा मृत्यू तर ४ जखमी

या भीषण अपघातानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानंतर कुटंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

अकोल्यात ट्रक आणि दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

अकोला खामगाव जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. दोघेही दुचाकीस्वार होते. अकोल्यात गुरुवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचे चाक रस्त्याच्या भेगांमध्ये अडकले. त्यानंतर दुचाकी घसरून ट्रकवर आदळली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार मृत्यूमुखी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com