Delhi Election Result : दिल्लीत भाजपचा 'विशाल' विजय, तर अरविंद केजरीवालांचं पॅकअप; जाणून घ्या 'आप'च्या पराभवाची ६ कारणे

delhi election result 2025 : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरु झाली आहे. भाजप ४० हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. तर आप २० जागांवर आघाडीवर असल्याचं मिळत आहे.
Delhi Election result
Delhi Election Saam tv
Published On

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा सुपडासाफ झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप आघाडीवर आहे. तर 'आप' बॅकफूटवर गेली आहे. या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आम आदमी पक्षाची पराभवाकडे वाटचाल सुरु आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्ष बॅकफूटवर का गेला, याची चर्चा सुरु झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले होते. त्यांच्यासहित २ महत्वाचे मंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. तुरुंगात काही दिवस काढल्यानंतर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना जामीन मिळाला होता. तरीही अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकरांकडून सहानुभूती मिळालेली नाही.

अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांची नाराजी

अरविंद केजरीवाल यांच्याकडून विरोधकांवर आरोप केले जात होते. आरोप केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना माफी देखील मागावी लागली होती. यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होत चालली होती. हरियाणा सरकारवर त्यांनी विषारी पाणी पाजल्याचा आरोप केला होता. त्यांनी हरियाणा सरकारवर गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांच्या आरोपामुळे दिल्लीत खळबळ उडाली होती. दिल्ली जल बोर्डाच्या इंजिनीअरने हरियाणाचं पाणी सीमेवर रोखल्याने हजारो लोकांचे प्राण वाचले, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य त्यांच्या समर्थकांनाही रुचलं नव्हतं.

Delhi Election result
Delhi Name History: 'दिल्ली' हे नाव कसं पडलं? पूर्वीचा इतिहास जाणून घ्या

अरविंद केजरीवाल यांच्या 'शीशमहला'चा मुद्दा

अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात येण्यापूर्वी व्हीव्हीआयपी संस्कृती संपवण्याची भाषा केली होती. त्यांनी कार, बंगला आणि सुरक्षा घेणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी लग्झरी गाडी, पंजाब सरकारची सुरक्षा घेतली. मुख्यमंत्री असताना त्यांनी मोठा बंगला बांधला. अनेक जण त्यांच्या बंगल्याला 'शीशमहल' बोलू लागले होते. यामुळे त्यांच्या 'आम आदमी' प्रतिमेला धक्का बसला. त्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या खर्चावरही अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते.

Delhi Election result
Delhi Assembly Election Result : दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललं, आपचा झाडू साफ, केजरीवाल पिछाडीवर

योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचा फटका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'कटेंगे तो बटेंगे' नारा दिला होता. त्यांनी ही घोषणा बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात केली होती. योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचा परिणाम दिल्लीत दिसून आला. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली नाही. त्याचाही फटका दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्याचा परिणाम हरियाणामध्ये पाहायला मिळाला होता.

लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देण्यास सुरुवात न करणे

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे विधानसभा निवडणुकीचे मुद्दे एक सारखेच होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांची जादू दिल्लीत चालली नाही. तर झारखंडमध्ये झामूमो सरकार येण्याचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं गेलं. अरविंद केजरीवाल यांनी यंदा लाडकी बहीण योजना राबवली नाही, तर सत्तेत आल्यास योजना राबवतील का, याबाबत शंका लोकांमध्ये निर्माण झाली. दिल्ली सरकराने लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काही महिन्याआधी राबवली असती, तर त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला असता.

Delhi Election result
Delhi Assembly Election: दिल्लीतील मुस्लिम बहुल मतदारसंघ कुणाच्या बाजूनं? आप, काँग्रेस की भाजप?

दिल्लीत दूषित पाणीपुरवठा

दिल्लीत मुलभूत सुविधांच्या अभावामुळे लोक त्रस्त झाले होते. दिल्लीत शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. उन्हाळ्यात दिल्लीकर पाण्यामुळे त्रस्त झाले होते. पाणीपुरवठ्याच्या अभावामुळे टँकर माफीया वाढले होते. दिल्ली सरकारनेही टँकर माफियांपुढे गुडघे टेकले होते. अरविंद केजरीवाल यांनी २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, बहुतांश दिल्लीकरांना दुषित पाणीही काही तास मिळत होते. तसेच दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था कोलमडली होती. d

Delhi Election result
Sanjay Raut on Delhi Elections: दिल्ली निवडणुकीत 'महाराष्ट्र पॅटर्न'? संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

आपमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

कोर्टाच्या आदेशामुळे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडलं होतं. त्यानंतर पक्षाने आतिशी यांना मुख्यमंत्री केले होते. अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, अशी कुणकुण दिल्लीकरांना लागली होती. तसेच केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, तर लोकांचे प्रश्न सोडवण्यास त्यांना अडचणी येतील, अशीही दिल्लीकरांमध्ये चर्चा होती. आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या जागी मुख्यमंत्रिपदाचा दुसरा चेहरा दिला असता, तर निवडणुकीत दुसरं चित्र पाहायला मिळालं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com