अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

srinagar crpf vehicle accident : श्रीनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव झाली.
srinagar crpf vehicle news
srinagar crpf vehicle accident Saam tv
Published On
Summary

श्रीनगरच्या अहमदनगर रोडवर सीआरपीएफचे वाहन कालव्यात कोसळलं

अपघातात ९ जवान जखमी, त्यांच्यावर उपचार सुरू

स्थानिक पोलीस आणि नागरिकांकडून तत्काळ बचावकार्य सुरू

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचं बुलेटप्रुफ वाहनाची अपघात घडला आहे. वाहन अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळल्याची घटना घडली. वाहनातील ९ जवान जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस मदतीला धावले. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अहमदनगर रोडवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचं वाहन अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळलं. या बुलेटप्रुफ वाहनात ९ जवान होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिक मदतीला धावले. त्यांनी तातडीने या जवानांना वाहनातून काढून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

srinagar crpf vehicle news
खासगी कंपनीतील बड्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या? व्यावसायिकांमध्ये खळबळ

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या अहमदनगरच्या डगपोरा-उमरहैर रोडवर हा अपघात घडला. चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने दुर्घटना घडली. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. बुलेटप्रुफ वाहन क्रेनच्या मदतीला काढलं जात आहे.

srinagar crpf vehicle news
पालघरमध्ये अपघाताचा थरार; भरधाव पिकअपने चिरडल्याने २ महिलांचा जागीच मृत्यू

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या दुर्घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बुलेटप्रुफ वाहन कालव्यात कोसळल्याचं दिसत आहे. अपघातस्थळी स्थानिक पोलीस, सैन्यदल आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांनी अपघाताच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Q

अपघात नेमका कुठे घडला?

A

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील अहमदनगर भागात हा भीषण अपघात घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com