

पालघरमध्ये भीषण अपघात.
भरधाव पिकअपने दोन महिलांना चिरडले
पालघरमध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झालाय
राज्यात अपघाताचं सत्र सुरूच आहे. धुळ्यामध्ये अपघाताची घटना ताजी असताना पालघरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. पालघरमध्ये भरधाव पिकअपने दोन महिलांना चिरडले. या अपघातात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे रस्त्यावर तणावाचं वातावरण निर्माण झालं.
पालघरमध्ये आठवडी बाजार आटपून घराकडे पायी निघालेल्या दोन पादचारी महिलांना एका भरधाव पिकअपने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघर नंडोरे या मार्गावर हा भीषण अपघात घडला.
पालघरहून बाजार करून निघालेल्या लता निलेश तरे (वय 45) आणि बेबी चंद्रकांत जाधव (वय 65) या दोन महिला पायी घराकडे निघाल्या होत्या. याचवेळी समोरून आलेल्या भरधाव पिकअपने दोन्ही महिलांना चिरडलं. या दोघींचा दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिकअप चालक हा 24 वर्षीय शिकाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातंय. पालघर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आहे. सध्या पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान गावाजवळ काळीज पिळवटून टाकणारी एक दुर्घटना घडली आहे. धुळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या लेनवरील हॉटेल मानससमोर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मण निंबा गुंजाळ (वय ३५) आणि त्यांचा अवघा तीन वर्षांचा मुलगा आदित्य लक्ष्मण गुंजाळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लक्ष्मण गुंजाळ हे कुटुंबासह दुचाकीने गाणेगावकडे जात असताना त्यांच्यावर अवधान गावाच्या हद्दीत काळाने घाला घातला.अपघाताच्या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.