रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Russia-Pakistan Agreement Sparks : रशिया आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय करार झालाय... त्यामुळे भारतावर या कराराचा नेमका काय परिणाम होणार? पाकिस्ताननं रशियाशी जवळीक का वाढवलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
india security
russia and pakistan dealSaam tv
Published On

कधीकाळी एकमेकांचे कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या रशिया आणि पाकिस्तानमध्ये आता चांगलीच यारी जमलीय... आणि त्याला कारण ठरलाय...रशिया आणि पाकिस्तानमध्ये झालेला द्विपक्षीय करार....एकीकडे भारतानं अमेरिकेसोबत ट्रेड डिल केल्यानंतर रशियानं थेट पाकिस्तानशी जवळीक वाढवल्यानं भारत-रशियामधील 5.7 लाख कोटींच्या द्विपक्षीय व्यापारावर याचा काय परिणाम होणार... दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणांमध्ये कसा मोठा बदल होणार? पाहूयात...

पाकिस्तान आणि रशियामध्ये तात्काळ विमानसेवा सुरु होणार

दोन्ही देशांमधील व्यापारातील आर्थिक अडथळे दूर करण्यावरही भर

व्यापाऱ्यांसाठी मालाची वाहतूक आणि पेमेंट सुविधा सुलभ होणार

दोन्ही देश रस्तामार्गे मालाची वाहतूक करणार

पाकिस्तान चीन आणि मध्य आशियाई देशांमधून सुरक्षित जमीन कॉरिडॉर स्थापन करणार

india security
शेवटची इच्छा अपूर्णच राहिली; भरधाव वाहनाने चिरडून वडिलांचा मृत्यू,भीषण अपघातामुळे बापलेकींची ताटातूट

दरम्यान रशिया फक्त व्यापारापुरतं मर्यादित न राहता पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठी गुंतवणूक करणार आहे.... मात्र पाकिस्ताननं रशियासोबत संरक्षण क्षेत्रातही हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केल्यास भारताच्या संरक्षण सज्जतेवर काय परिणाम होईल? पाहूयात....

भारताची सुमारे 60% शस्त्रास्त्र रशियन बनावटीची

युद्धजन्य परिस्थितीत रशियाकडून मिळणाऱ्या लष्करी पुरवठ्यात उशीर होण्याची शक्यता

रशिया पाकिस्तानला प्रगत शस्त्रास्त्रं, लढाऊ विमानं पुरवण्याची भीती

चीनच्या दबावामुळे रशिया भारताशी असलेले संवेदनशील संरक्षण करार कमी करण्याची शक्यता

भारताच्या सीमा सुरक्षेपुढे अधिक आव्हान

रशियाने पाकिस्तानमार्गे व्यापार सुरू केल्यास चाबहारचे महत्त्व कमी होणार

india security
ऐतिहासिक निर्णय, नॉनव्हेज खाण्यावर बंदी; हॉटेल-दुकानातही चिकन, मटण मिळणार नाही, कोणत्या शहरात मनाई?

दरम्यान चीन पाकिस्तानला रशियाशी जोडून भारताभोवती एक अभेद्य तटबंदी उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचंही स्पष्ट होतयं... त्यामुळे रशियाचं हे 'पाक-प्रेम' भारतासाठी किती डोकेदुखी ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com