सत्तासंघर्षावरून भाजप फुटली, काँग्रेसकडून महायुतीसह ठाकरे गटाचा गेम; भिवंडीत नेमकं काय घडलं?

Bhiwandi news : भिवंडीतील सत्तासंघर्षावरून भाजप फुटली. महापौरपदावरून भाजपचे भिवंडीत दोन गट पडले. भिवंडीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

भिवंडीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. भिवंडी महापालिकेच्या सत्तासंघर्षावरून भाजप फुटल्याचे चित्र पाहायला मिळालं.महापौरपदावरून भाजपमध्ये उभी फूट दिसून आली. भाजपमधील दोन गट आणि काँग्रेसमधील नाराजीमुळे भिवंडी महानगरपालिकेत महापौर निश्चित झाला. आज शुक्रवारी भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची महापौरपदी वर्णी लागल्याचे दिसून आलं. भिवंडीत काँग्रेसने थेट भाजपला शह दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आघीडीने भिवंडी पालिकेत सत्तास्थापन केली आहे. या निवडीदरम्यान नारायण चौधरी यांना ४८ मते मिळाली, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना १६ मते पडली. यावेळी भाजपची ६ मते फुटल्याचे दिसू आलं. भाजपमध्ये दोन गट पडल्याने त्यांना मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com