खासगी कंपनीतील बड्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या? व्यावसायिकांमध्ये खळबळ

Mumbai Shocking news : मुंबईतील बड्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अधिकाऱ्याच्या मृत्यूने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालीये.
Mumbai news
Mumbai Shocking news Saam tv
Published On
Summary

सॅमको म्युच्युअल फंडचे अधिकारी पंकीत शाह यांचा संशयास्पद मृत्यू झालाय

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याची माहिती हाती आली आहे

कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतून खळबळजनक माहिती समोर आली आहे. सॅमको म्युच्युअल फंडचे ३९ वर्षीय प्रमुख बिझनेस ऑफीसर पंकीत शाह यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंकीत हे मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील चड्डा प्रीमायसेस, हबटाउन सोलारस इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर त्यांना जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी पंकीत शाह यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूनंतर हत्या की आत्महत्या, अशी व्यावसायिकांमध्ये सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.22 वाजता अंधेरी पोलीस ठाण्याच्या मोबाईल पथकाला एका व्यक्तीकडून Samco म्युच्युअल फंडचे चीफ बिझनेस ऑफिसर (CBO) पंकीत शाह (वय 39) यांनी चड्डा प्रीमायसेस, हबटाउन सोलारस लिमिटेडच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचा कॉल प्राप्त झाला.

Mumbai news
ऐतिहासिक निर्णय, नॉनव्हेज खाण्यावर बंदी; हॉटेल-दुकानातही चिकन, मटण मिळणार नाही, कोणत्या शहरात मनाई?

कॉल आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पंकीत शाह खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. ते विलेपार्ले (पश्चिम) येथील नीलमणी बिल्डिंगमध्ये वास्तव्यास होते. जखमी अवस्थेत त्यांना ॲम्बुलन्सद्वारे कूपर रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दुपारी 12.47 वाजता रुग्णालयात दाखल करण्याआधी मृत घोषित केले.

Mumbai news
प्रसिद्ध मराठमोळ्या रीलस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील जवळच्या सदस्याचं निधन

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक अदलिंग आणि ड्युटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक अकोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अकोलकर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com