

प्रसिद्ध रिलस्टार शुभम जाधव याच्या वडिलांचं निधन झालंय
शुभमने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीये
त्याच्या पोस्टवर मराठी कलाकार आणि मित्रांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली
प्रसिद्ध रिल्सस्टार प्रथमेश कदमने अकाली जगाचा निरोप घेतला. प्रथमेशना रक्तातील पांढरी कावीळ झाल्याने मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध रिल्सस्टारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रथमेश कदमच्या निधनाची घटना ताजी असताना आणखी एक प्रसिद्ध रिल्सस्टार शोकसोगरात बुडालाय. प्रसिद्ध रिलस्टार शुभम जाधवच्या वडिलांचं निधन झालं आहे. शुभम जाधवने पोस्ट लिहित त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. शुभम जाधवने वडिलांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. शुभमने वडील आणि कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा, तुम्ही खूप लवकर गेलात, अशी पोस्ट शुभमने वडिलांसाठी लिहिली आहे.
शुभमच्या पोस्टवर त्याच्या अनेक रिलस्टार आणि कलाकार मित्रांनी वडिलांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींनी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी शुभमला आता काळजी घे म्हणत आधार दिला आहे.
शुभम जाधव हा करण सोनावणेचा चांगला मित्र आहे. करण हा काही दिवसांपूर्वी बिगबॉस मराठी 6 बाहेर आला. करण, शुभमचे मित्र अनेक व्हिडिओ, रिल्स तयार करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असता. शुभमने बिगबॉसमध्ये करण सोनावणेला सपोर्ट करत होता.
शुभमने त्याच्या वडिलांचा रुग्णालयातील फोटो देखील शेअर केला आहे. त्याने पोस्टमध्ये वडिलांना नेमका कोणता आजार झाला होता, त्याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वडिलांच्या रुग्णालयातील फोटोवरून ते कोणत्यातरी गंभीर आजाराचा सामना करत होते, असे फोटोतून दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.