Cough Syrups : डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळणार कफ सिरप; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Cough Syrups Rules : खोकल्याचे सिरप सारखी औषधे आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन नियम लागू करत ओव्हर-द-काउंटर विक्रीवर बंदी घातली आहे.
COUGH SYRUP SALE RULES CHANGED IN INDIA: DOCTOR PRESCRIPTION NOW MANDATORY FOR PURCHASE
COUGH SYRUP SALE RULES CHANGED IN INDIA: DOCTOR PRESCRIPTION NOW MANDATORY FOR PURCHASESaam Tv
Published On
Summary
  • कफ सिरप सारख्या औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

  • प्रिस्क्रिप्शनशिवाय होणारी विक्री बंद करण्यात आली आहे

  • मुलांच्या मृत्यूच्या घटनांनंतर औषध सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

तुम्हालाही घसा खवखवला किंवा घसा दुखला की लगेच खोकल्याचं सिरप आठवतं बरोबर ना. यापूर्वी ते सिरप मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन थेट खरेदी करता येत होतं, मात्र आता त्याबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. या औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता कोणतेही सिरप खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे.

मध्य प्रदेशातील कफ सिरपमुळे एकूण २२ मुलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, राजस्थानमध्येही खोकल्याचे औषध प्यायल्याने मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर सरकारने खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ९ जून रोजी यासंदर्भातील अधिकृत सूचना जारी केली आहे.

COUGH SYRUP SALE RULES CHANGED IN INDIA: DOCTOR PRESCRIPTION NOW MANDATORY FOR PURCHASE
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार प्रवेश

या निर्णयानुसार, सिरप स्वरूपातील औषधांची ‘ओव्हर द काउंटर’ (OTC) म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणारी विक्री बंद करण्यात आली आहे. सरकारने यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये यासंबंधी अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर आता हा निर्णय अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. भारतातील ड्रग्ज नियमांनुसार, १९४५ मध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली आहे. याअंतर्गत ‘शेड्युल K’ मधील काही सवलतींमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सिरप सारख्या औषधांना मिळणारी सूट काढून घेण्यात आली आहे. यामुळे कफ सिरप आणि इतर सिरप सारखी औषधे आता पूर्वीप्रमाणे विकता येणार नाहीत.

COUGH SYRUP SALE RULES CHANGED IN INDIA: DOCTOR PRESCRIPTION NOW MANDATORY FOR PURCHASE
Monsoon Upate : मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून

या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार आहे. किरकोळ खोकला किंवा सर्दीसाठी स्वतःच्या मनाने कफ सिरप खरेदी करण्याचा पर्याय आता उपलब्ध राहणार नाही. डॉक्टरांच्या तपासणीनंतर मिळालेल्या प्रिस्क्रिप्शनवरच मेडिकल स्टोअर्सना ही औषधे विकता येतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई तसेच परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com