Monsoon Upate : मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून उष्ण व दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने काही भागांत येलो अलर्ट जारी केला आहे.
MAHARASHTRA MONSOON UPDATE: IMD SAYS MONSOON TO COVER MUMBAI AND ENTIRE STATE BY JUNE 20
MAHARASHTRA MONSOON UPDATE: IMD SAYS MONSOON TO COVER MUMBAI AND ENTIRE STATE BY JUNE 20Saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन अद्याप लांबणीवर

  • राज्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त

  • काही भागांत येलो अलर्ट

  • पुढील काही दिवसांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता

Maharashtra Weather Update News राज्यात शेतकरी मान्सूनची चातकासारखी वाट पाहत असताना दुसरीकडे पावसाअभावी सर्वत्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागतं आहे. मात्र पाऊस पडणार तरी कधी? हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. राज्यातील दक्षिण भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात मात्र मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली आहे. पावसाचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका आणि दमट उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज कोकणासह राज्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून उन्हाचा चटका कायम राहण्याची आणि विजांसह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MAHARASHTRA MONSOON UPDATE: IMD SAYS MONSOON TO COVER MUMBAI AND ENTIRE STATE BY JUNE 20
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार प्रवेश

दरम्यान, बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनची पुढील प्रगती सुरू असून सोमवारी तो आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांपर्यंत पोहोचला आहे. मात्र अरबी समुद्राकडून मॉन्सूनची हालचाल गेल्या आठवडाभरापासून स्थिर असल्याने महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मॉन्सूनचे आगमन अद्याप लांबणीवर पडले आहे.

MAHARASHTRA MONSOON UPDATE: IMD SAYS MONSOON TO COVER MUMBAI AND ENTIRE STATE BY JUNE 20
Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे ताजे दर

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील ४ ते ५ दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार तसेच छत्तीसगडच्या काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या पुढील हालचालींकडे लागले आहे. उष्णतेमुळे वाढलेला उकाडा आणि अधूनमधून येणाऱ्या वादळी पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com