काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणूक अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांचं वाराणसी येथील विमानतळावर आगमन झालंय. यावेळी विमानतळावर हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी अजय राय यांच्यासमोर हजारो कार्यकर्त्यांचा गराडा होता.
यावेळी अजय राय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजय राय म्हणाले, 'काँग्रेस पक्षाने २०१४ साली मोठी जबाबदारी सोपवली होती. भाजपने मला अनेक प्रकारे घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाही झुकलो नाही, पुढेही झुकणार नाही'.
तत्पूर्वी, यावेळी राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर उत्तर देताना अजय राय म्हणाले, 'यावेळी देखील राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत. प्रियंका गांधी यांना देखील आमचं पूर्ण समर्थन असणार आहे'.
तसेच यावेळी भाजप महिला नेत्या स्मृती इराणी यांच्यावरही टीका केली. 'स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, कमळाचं बटन दाबा अन् १३ रुपये साखर मिळवा, मात्र त्यांनी आश्वासन पूर्ण केलं का? असा सवाल करत अजय राय यांनी टीकास्त्र सोडलं.
काँग्रेस नेते अजय राय पुढे म्हणाले की, मोदी सरकार ईडी, सीबीआयची भीती दाखवत आहे. राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचा संदेश हा कार्यकर्त्यांच्या घरा-घरात पोहोचवणार आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.