Bihar Crime News: बिहारमध्ये गुंडाराज! भल्या पहाटे पत्रकाराची हत्या, घरात घुसून चौघांनी केला बेछुट गोळीबार

Bihar Crime News: अररियामध्ये एका वृत्तपत्राच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे.
Bihar Crime News
Bihar Crime NewsSaam tv
Published On

Bihar News: बिहारमधून खळबळजनक वृत्त हाती आलं आहे. बिहारच्या अररियामध्ये एका वृत्तपत्राच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. ही घटना आज, शुक्रवारी भल्या पहाटे साडे पाच वाजता घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील अररिया जिल्ह्यातील रानीगंज येथील विमल कुमार यांच्या घरात चार जण घरात बळजबरीने शिरले. त्यांनी विमल यांना झोपेतून उठवलं. त्यानंतर त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात पत्रकार विमल कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार विमल कुमार यांच्या छातीत गोळी लागल्याने ते जागीच ठार झाले. (Bihar Crime News)

Bihar Crime News
Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? चारा घोटाळा प्रकरणात मिळालेल्या जामिनाविरोधात CBIची सुप्रीम कोर्टात धाव

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या खळबळजनक प्रकरानंतर घटनास्थळी रानीगंजच्या लोकांनी एकच गर्दी केली. तसेच घटनास्थळी मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त आहे.

पत्रकार विमल जागीच ठार

तत्पूर्वी, पत्रकार विमल यांच्या चौघांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरड करत आजूबाजूंच्या लोकांना बोलावलं. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. तर काही लोकांनी विमल यांना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी उपचाराआधीच त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर विमल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

रुग्णालयाजवळ मोठ्या संख्येने पत्रकार पोहोचले आहेत. तसेच स्थानिक नेत्यांसहित बडे पोलीस अधिकारी देखील पोहोचले आहेत. लोकांकडून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

Bihar Crime News
Delhi - Pune Vistara flight: दिल्ली-पुणे विमानात सकाळी-सकाळी बॉम्बच्या धमकीचा फोन; तपासणीनंतर सत्य आलं समोर

भावाचीही गोळ्या घालून हत्या

एका रिपोर्टनुसार, काही वर्षांपूर्वी पत्रकार विमल यांच्या भावाचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. विमल हे त्यांच्या भावाच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. हे प्रकरण कोर्टात सुरु होतं. याच प्रकरणामुळे पत्रकार विमल यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com