Delhi - Pune Vistara flight: दिल्ली-पुणे विमानात सकाळी-सकाळी बॉम्बच्या धमकीचा फोन; तपासणीनंतर सत्य आलं समोर

Bomb threat on Delhi-Pune Vistara flight : दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आल्यानं एकच खळबळ उडाली.
Bomb threat on Delhi-Pune Vistara flight/representative Image
Bomb threat on Delhi-Pune Vistara flight/representative ImageSAAM TV
Published On

Bomb threat on Delhi-Pune Vistara flight : दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आल्यानं एकच खळबळ उडाली. खबरदारी म्हणून तात्काळ विमान आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. विमानात असलेल्या प्रवाशांना तात्काळ उतरवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज, शुक्रवारी सकाळी साधारण ७ वाजून ४५ मिनिटांनी जीएमआर कॉल सेंटरला एक फोन आला. दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे दिल्ली विमानतळावर गोंधळ उडाला. (Latest Marathi News)

विमान तातडीने आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. विमानात तपासणी करण्यात आली.

सुरक्षा यंत्रणांतील एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला या घटनेबाबत माहिती दिली. युके-९७१ दिल्लीहून पुण्यासाठी उड्डाण भरणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती देणारा फोन जीएमआर कॉल सेंटरला आला. विमानात १०० हून अधिक प्रवासी होते. त्यांना उतरवण्यात आले, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Bomb threat on Delhi-Pune Vistara flight/representative Image
Urfi Javed Death Threat: तुला लवकरच गोळी घालून संपवू! उर्फी जावेदला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर सुरक्षा एजन्सीद्वारे तपासणीसाठी ते आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. तपासणी केली असता, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवाशांना टर्मिनल भवनमध्ये थांबण्यास सांगितले. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिझर (एसओपी)नुसार, जोपर्यंत सुरक्षा एजन्सीमार्फत मंजुरी दिली जात नाही, तोपर्यंत विमान पुन्हा कधी उड्डाण भरेल हे निश्चित करता येत नाही. सुरक्षा यंत्रणांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच विमान पुण्यासाठी उड्डाण भरेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Bomb threat on Delhi-Pune Vistara flight/representative Image
Amit Bhadana Received Threats: प्रसिद्ध युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी, FIR दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com