बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशनमुळे संकटात सापडली आहे. उर्फीला जिवेमारण्याची धमकी अली आहे. उर्फीच्या बाबतीत हे पहिल्यांदा घडत नासिन या आधी देखील तिला अश्या धमक्या आल्या आहेत.
उर्फीने तिच्या मेलचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. या मेल पाठवणाऱ्याने उर्फीला धमकी देत म्हटलं आहे की, 'भारतीयांना (सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालून)असं खराब करणं थांबावं, नाहीतर तुला गोळी घालून संपवेन.'
या मेलच्या सब्जेक्ट प्रमोद सिंग (ज्यांनी हा मेल पाठवला आहे) त्यांनी हिंदीमध्ये लिहिले आहे की, 'तुला लवकरच गोळी मारून संपवू. तू खूप घाण पसरवली आहेस.'
तर मेलमध्ये लिहिले आहे की, 'लवकरच तुला गोळी मारू. हे मिशन आम्ही येत्या काही दिवसात पूर्ण करणार आहोत, तू भारतात खु घाण पसरवली आहेस. ती सर्व घाण आता साफ होईल.'
हा स्क्रीनशॉर्ट शेअर करत उर्फीने लिहिले आहे, 'हे माझ्या आयुष्यत रोजच होत असतं.'
उर्फीने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी उर्फीचे फॅन तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. एका युजरने लिहिले की, "घाबरू नकोस, पण तुला धमकावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कर."
दुसर्या युजरने लिहिले, "त्यांना भुंकू द्या, तू खरी धाडसी मुलगी आहेस, मी तुझा खूप आदर करतो त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. फक्त दुर्लक्ष करा." उर्फीच्या आणखी एका चाहत्यांनी लिहिले आहे की, "त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा.. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे."
उर्फीला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उर्फीने खुलासा केला होता की तिच्या जुन्या ब्रोकरने तिला धमकावले होते.
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट करत तिने लिहिले, “म्हणून हा माणूस 3 वर्षांपूर्वी माझा ब्रोकर होता, अचानक त्याने मला मेसेज करायला सुरुवात केली. त्याने मला फोन करून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. (Celebrity)
हा माणूस मला ओळखत होता. आता तुम्हाला हिंदुस्थानी भाऊ सारख्या लोकांची त्रास झाला म्हणून मी दिसले, तो माणूस मला धमकावत आहे म्हणून कोनोही मला फोने करून धमकावलं असं वाटत. फोन करून माझ्यावर बलात्कार करू शकतात आणि मी माझ्या अंगावर जे घातले आहे त्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देऊ शकतात.”
दुसर्या एका स्टोरीमध्ये तिने लिहिले, “दुर्दैवाने हा माणूस आहे, मी भारतात नसते तर मी त्याच्याविरोधात तक्रार केली असती. पण मला आशा आहे की तुम्हाला प्रॉब्लेम दिसला आहे, इतर पुरुषांनी असं वाटत मला कॉल करून, जिवे मारण्याची धमकी देऊन, माझ्यावर बलात्कार करण्याची धमकावणे योग्य आहे. आज ते मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.