Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? चारा घोटाळा प्रकरणात मिळालेल्या जामिनाविरोधात CBIची सुप्रीम कोर्टात धाव

चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेईना.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSaam TV
Published On

Lalu Prasad Yadav News: चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेईना. चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतु आता लालू प्रसाद यादव यांना मिळालेल्या जामिनाविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

एका रिपोर्टनुसार, सीबीआयने लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात मिळालेल्या जामिनाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात २५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सीबीआयने चारा घोटाळ्यातील दुमका, डोरंडा, चाईबासा आणि देवघर प्रकरणात मिळालेल्या जामिनाविरोधात याचिका दाखल केली आहे.

Lalu Prasad Yadav
INS Vindhyagiri Launch: नौदलाची ताकद वाढणार! 'INS विंध्यगिरी' युद्धनौकचे राष्ट्रपतींकडून उद्घाटन; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

तत्पूर्वी, सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, लालू प्रसाद यादव यांना देवघर प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, परंतु त्यांना जास्तीत जास्त ७ वर्षांची शिक्षा मिळायला हवी.

या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासहित एकूण सहा जणांना तीन ते सहा वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे सीबीआयने लालू प्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा मिळावी, असं याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, देवघर प्रकरणातील दोषी फूलचंद सिंह, आरके राणा गुजर यांचा मृत्यू झाला आहे. हस्तक्षेप याचिकेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर या प्रकरणात दोघांचा नाव काढून टाकण्याचा आदेश देण्यात आले होते.

Lalu Prasad Yadav
CAG Report : मोदी सरकारच्या अनेक प्रकल्पांमध्ये अनियमितता, CAGच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. लालू प्रसाद यादव जामीनावर बाहेर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेमुळे लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com