CAG Report : मोदी सरकारच्या अनेक प्रकल्पांमध्ये अनियमितता, CAGच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

CAG report on Govt Project : कॅगने आपल्या अहवालात ७ प्रकल्पांमध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे.
CAG Report
CAG ReportSaam TV
Published On

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार विविध प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालातून उघड झालं आहे. भारतमाला प्रकल्पात तर लाखो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कॅगच्या अहवालानंतर आपने केला आहे.

कॅगने आपल्या अहवालात ७ प्रकल्पांमध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. यामध्ये भारतमाला प्रकल्प, आयुषमान भारत, अयोध्या विकास प्रकल्प, पेन्शनचा निधी, हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स, द्वारका एक्स्प्रेस वे, टोल घोटाळा या प्रकल्पांचा समावेश आहे.

CAG Report
Bacchu Kadu News : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? 15 मतदारसंघात प्रहारची स्वबळाची तयारी

द्वारका एक्स्प्रेस वे प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात तर कित्येक पटीने वाढ झाल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. रस्त्याचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून सुमारे २५० कोटींवर दाखवला गेला आहे. (Latest Marathi News)

आयुषमान भारत योजनेत तर ७.५ लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाइल क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. थर उपचारादरम्यान मृत झालेल्या ८८ हजार रुग्णांचे बिल पास केले. अयोध्या प्रकल्पातही अनियमितता आढळल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारने जाहिरातींवर खर्च केल्याची बाब समोर आली आहे. (Political News)

CAG Report
Malaysia Plane Crash Video : मलेशियात चार्टर प्लेन महामार्गावर कोसळलं; १० जणांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

काँग्रेसने यानंतर आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा सगळा पैसा गेला कुठे यावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com