Malaysia Plane Crash : मलेशियामध्ये एका भीषण विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये एक चार्टर प्लेन लँडिंगआधी एक्स्प्रेस वेवर कोसळलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानात 2 फ्लाइट क्रू मेंबर्ससह एकूण 6 लोक होते. हे विमान लांगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करून 'सुलतान अब्दुल अजीज शाह' विमानतळावर उतरणार होते. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान दुर्घटनग्रस्त झालं. (Accident News)
मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एक निवेदन जारी करत सांगितलं की, सबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचा चार्टर प्लेनशी दुपारी 2.47 वाजता पहिला संपर्क झाला. या विमानाला 2.48 मिनिटांनी उतरवण्याची मंजुरी देण्यात आली. (Latest Marathi News)
मात्र कंट्रोल टॉवरला पहाटे 2.51 वाजता घटनास्थळावरून धूर निघताना दिसला. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, विमान रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कोसळलं. विमान वाहनांवर कोसळल्याने काही जण जखमीही झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.