Sonia Gandhi Hospitalized: सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi Hospitalized : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sonia Gandhi Hospitalized :
Congress leader Sonia Gandhi admitted to Sir Ganga Ram Hospital in Delhi following sudden health issues.saam tv
Published On
Summary
  • सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली

  • दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल

  • छातीत त्रास झाल्याने उपचार सुरू

काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक खालावली. त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीच्या त्रास होत असल्याने सोनिया गांधी यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sonia Gandhi Hospitalized :
West Bengal Politics: ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक खालावली. यानंतर, त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी जानेवारी २०२६ मध्ये सोनिया गांधी यांची प्रकृती लक्षणीयरीत्या खालावली होती. त्यानंतर त्यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करत तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार करण्यात आले होते.

Sonia Gandhi Hospitalized :
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू, राजकीय वर्तुळात शोककळा

सोनिया गांधी यांच्या छातीत त्रास होता, त्यामुळे त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे देखील रुग्णालयात उपस्थित आहेत. डॉक्टरांच्या मते, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या चांगली आहे.

डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छातीरोग तज्ज्ञांचे एक पथक त्याची तपासणी करत आहे. रुग्णालय व्यवस्थापन आणि पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना गेल्या काही दिवसापासून प्रदूषणामुळे खोकल्याचा त्रास होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com