West Bengal Politics: ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

TMC Leader Joins BJP: पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीएमसी नेते अर्घ्य रॉय प्रधान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असून. राज्यातील राजकीय तणाव वाढला आहे.
TMC Leader Joins BJP:
TMC leader switches to BJP ahead of elections, intensifying political battle in West Bengal.Saam tv
Published On
Summary

टीएमसीचे नेते अर्घ्य रॉय प्रधान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण अधिक तापले

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होत अतसाना राजकीय नेत्यांनी पक्षांत्तरांचा धडाका लावलाय. ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसलाय. तृणमूल काँग्रेसचे नेते अर्घ्य रॉय प्रधान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

TMC Leader Joins BJP:
Election: पश्चिम बंगालमध्ये भाजप बाजी मारणार? ममता बॅनर्जी सत्ता राखणार, काँग्रेसचं काय होणार? धक्कादायक ओपिनियन पोल आला समोर

भाजपमध्ये प्रवेश करताच अर्घ्य राय प्रधान यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. "मी एका भ्रष्ट पक्षाला पाठिंबा देत जनतेच्या सामोरे जाऊ शकत नाही." बंगालमधील परिस्थिती म्हणजे ममताविरुद्ध जनता अशी आहे. टीएमसी संपली आहे. ते भाजपवर हल्ला करतील, ते राष्ट्रपतींवर टीका करत आहेत. टीएमसीने जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

TMC Leader Joins BJP:
TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

हुमायू आणि ओवैसी यांच्या युतीवर बोलताना अर्घ्य राय प्रधान म्हणाले, "हा टीएमसीचा प्लॅन बी आहे. भाजपला भारतीय मुस्लिमांशी काही अडचण नाहीये. आम्ही 'तुकडे-तुकडे' गँगसोबत नाही आहोत. हुमायू आणि फिरहादने बाबरी मशीद बांधली तरी सगळ्यांचा त्याला विरोध आहे. टीएमसीने समाजांमध्ये फूट पाडली आहे. ते सार्वजनिक जमीन हिसकावून घेत आहेत."

भाजपची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी अर्घ्य राय प्रधान उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर शरसंधान साधलं होतं. दरम्यान अर्घ्य राय प्रधान हे कूचबिहारच्या विकासासाठी लढलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी २०१६ पासून गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले असल्याची माहिती भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी दिली. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधला आहे.

उत्तर बंगालसाठी काही सूचना दिल्या आहेत, यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना केवळ विकास हवा, असंही सुवेंदू अधिकारी म्हणाले. अर्घ्य रॉय प्रधान हे दीर्घकाळापासून टीएमसीचे सदस्य होते. त्यांचे वडील अमर रॉय प्रधान हे देखील उत्तर बंगालच्या लोकांचे आवडते नेते होते, असं भाजप नेत्या शंकर राय म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com