महामार्गावर धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट, १४ प्रवाशांचा मृत्यू

Colombia Bus Bomb Blast: कोलंबियामध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली. धावत्या प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या बॉम्बस्फोटामध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Colombia: महामार्गावर धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट, १४ प्रवाशांचा मृत्यू
Colombia Bomb BlastSaam Tv
Published On

Summary -

  • कोलंबियामध्ये धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट

  • १४ प्रवाशांचा मृत्यू तर ३८ प्रवासी जखमी

  • सरकारकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला

कोलंबियामध्ये धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दक्षिण-पश्चिम कोलंबियामध्ये शनिवारी घडली. काउका प्रांताचे गव्हर्नर ऑक्टाव्हियो गुझमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, काहिबियो नगरपालिकेजवळ पॅनअमेरिकन महामार्गावरून बस जात असताना हा बॉम्बस्फोट झाला. कोलंबियन सशस्त्र दलाचे कमांडर जनरल ह्यूगो लोपेझ यांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. पूर्व फार्क (FARC) बंडखोरांचा गट हाइमे मार्टिनेजला जबाबदार धरण्यात आ आहे.

हा हल्ला गेल्या २ दिवसांत या प्रदेशात झालेल्या २६ गुन्हेगारी घटनांच्या मालिकेचा हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध केला. हल्लेखोरांना फॅसिस्ट आणि अमली पदार्थांचे तस्कर म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी इव्हान मोर्डिस्को नेटवर्क आणि जेमी मार्टिनेझ गटाला जबाबदार धरले आहे. सरकारसोबतचा २०१६ चा शांतता करार न स्वीकारणारे हे बंडखोर गट आता या भागातील अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत.

Colombia: महामार्गावर धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट, १४ प्रवाशांचा मृत्यू
Maoist Blast In Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद, गस्त घालत असताना घडवून आणला स्फोट

संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी स्पष्ट केले आहे की, हे हल्लेखोर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सरकार खंबीरपणे त्यांना प्रत्युत्तर देईल. गेल्या २ दिवसांपासून नैऋत्य कोलंबिया बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने हादरला आहे. शनिवारच्या स्फोटाआधी, एल तांबो येथे स्फोटकांनी भरलेले तीन ड्रोन पाडण्यात आले. शुक्रवारी, काली आणि पाल्मिरा येथील लष्करी तुकड्यांजवळ दोन कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.

Colombia: महामार्गावर धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट, १४ प्रवाशांचा मृत्यू
Delhi Bomb Blast: भारतातही हमासप्रमाणे हल्ल्याचा कट; उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक, NIAची मोठी कारवाई

दरम्यान, जनरल लोझेप यांनी सांगितले की, या हल्ल्यांचा थेट परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होत आहे. या हल्ल्यांनंतर केंद्र सरकारकडे तात्काळ मदत आणि अतिरिक्त सैन्यांना पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. काऊका आणि व्हाले देल काऊका ही अमली पदार्थांच्या तस्करीची प्रमुख शहरे झाली आहेत.बेकायदेशीर सशस्त्र गट मध्य अमेरिका आणि युरोपमध्ये अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी बुएनव्हेंचुरा बंदराकडे जाणाऱ्या सागरी आणि नदीमार्गांवर नियंत्रण मिळवू पाहत आहेत. त्यामुळे हल्ले करत नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

Colombia: महामार्गावर धावत्या बसमध्ये बॉम्बस्फोट, १४ प्रवाशांचा मृत्यू
"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणाव वाढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com