Chennai Crime news: चेन्नईमध्ये 'वाईफ स्वॅपिंग' करणारं मोठं रॅकेट, 13 ते 25 हजारांमध्ये व्हायचा सौदा, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Chennai Crime news: चेन्नईत सोशल मीडियाच्या माध्यमातून बायकोंची अदलाबदल करणारं रॅकेट (वाईफ स्वॅपिंग) चालवणाऱ्यांचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Chennai Crime news:
Chennai Crime news:Saam tv
Published On

Chennai Crime News:

चेन्नईमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. चेन्नईत सोशल मीडियाच्या माध्यमातून बायकोंची अदलाबदल करणारं रॅकेट (वाईफ स्वॅपिंग) चालवणाऱ्यांचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोड या भागात हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ८ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, चेन्नईत बायकोंची अदलाबदलांचं रॅकेट हे आठ जण गेल्या काही वर्षांपासून चालवत होते. या आठ जणांना चेन्नईत कोईम्बतूर, मदुराई, सेलम आणि इरोड या भागातून अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chennai Crime news:
Pune Crime News : जागरुक नागरिकांमुळे पाच सशस्त्र दरोडेखोर अटकेत; 5 तोळे सोने, 18 किलो चांदीसह 2 लाख 22 हजार हस्तगत

या प्रकरणात पोलिसांनी सेंथिल कुमार, कुमार, चंद्रमोहन, शंकर, वेलराज, पेरासन, सेल्वन आणि व्यंकटेशकुमार यांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून अविवाहित तरुणांना लक्ष्य केलं जायचं. या तरुणांना काही महिलांची ओळख करून दिली जायची. या रॅकेटच्या माध्यमातून वैश्याव्यवसायच चालवला जायचा.

या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'या आरोपींनी वाईफ स्वॅपिंगसाठी सोशल मीडिया पेज तयार केले होते. आरोपींची टोळी ही पुरुषांकडून १३ ते २५ हजारांची मागणी करायचे. त्यानंतर या पुरुषांना महिलांची ओळख करून दिली जायची. हे टोळकं पुरुषांकडून एकीकडे पैशांची मागणी करायचे. त्यासोबत या पुरुषांना इतर महिलांचं देखील आमिष दाखवलं जायचं.

Chennai Crime news:
Crime News: पती स्मार्ट दिसत नसल्यानं पत्नीचं भयंकर कृत्य; नवऱ्याला दिलं पेटवून

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी पहाटे आठ जणांना अटक केली. त्याचबरोबर या रॅकेटमधून 30 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्या महिला या विवाहित असून त्यांना पैशांचं आमिष देण्यात आलं होतं.

या प्रकाराची घटनास्थळावरील एका नागरिकाने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून हे रॅकेट उद्ध्वस्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com