

बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅड कॅम्पसमध्ये अचानक बैल घुसला
उधळलेल्या बैलामुळे पोलीस आणि अधिकाऱ्यांची दमछाक
हवालदाराला बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पळ काढावा लागला
बिहारच्या बेगूसरायमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आगमनाआधी सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हॅलीपॅड कॅम्पसमध्ये अचानक एक बैल शिरला. या बैलाला हाकलताना पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी बैल हल्ला करण्यासाठी धावल्याने एका हवालदाराला जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला.
बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार हे 'समुद्धी दौऱ्या'वर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि हेलीपॅडच्या आसपास सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला होता. परंतु ही सुरक्षा भेदून एक बैल हॅलीपॅड कॅम्पसमध्ये शिरला. या बैलामुळे उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि पोलील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.
उधळलेल्या बैलाने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि सुरक्षारक्षकाने बराच वेळ बैलाला मैदानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तासानंतर त्यांना बैलाला हेलीपॅडच्या कॅम्पसमधून बाहेर काढण्यास यश आलं. बैल उधळल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मोकाट जनावर अचानक हॅलीपॅड कॅम्पसमध्ये कसं पोहोचलं , असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. बैलाला कॅम्पसमधून बाहेर काढल्यानंतर आता सुरक्षा चोख असल्याचे सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार हे शनिवारपासून समृद्धी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा तिसरा टप्प्यात आज बेगूसरायच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या 'कॅम्पा कोला' बॉटलिंग प्लांटची पायाभरणी केली जाणार आहे. ही जिल्ह्यातील एक मोठी औद्योगिक गुंतवणूक ठरणार आहे. या प्लांटला अंदाजे १०००० कोटी खर्च होणार आहे. तर आसुवारी येथील BIADA परिसरातील ३५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे.
बैलामुळे काय गोंधळ झाला?
उधळलेल्या बैलाने पोलीसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी हवालदाराला जीव वाचवण्यासाठी धावत पळावे लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.