BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Blast Near BJP Office In Punjab: पंजाबच्या चंदीगडमध्ये भाजपच्या मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ
Blast Near BJP OfficeSaam tv
Published On

Summary -

  • चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर मोठा स्फोट

  • स्कूटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरला

  • कोणतीही जीवितहानी नाही

  • भाजप मुख्यालयाची इमारतही सुरक्षित आहे

  • पोलिस, फॉरेन्सिक आणि बॉम्ब पथकांकडून तपास सुरू

पंजाबमध्ये मोठी दुर्घटना घडली. चंदीगडमधील भाजपच्या मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आसपासचा परिसर हादरला. पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडच्या सेक्टर-३७ मध्ये बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घनटेमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडच्या भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. या आवाजामुळे एकच गोंधळ उडाला. ही स्कूटर भाजप मुख्यालयामध्ये काम करणाऱ्या एका तरुणीची असल्याची माहिती समोर आली आहे.

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ
TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आयजी पुष्पेंद्र कुमारसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही तसंच काही नुकसान झाले नाही. भाजप मुख्यालयाची इमारत देखील सुरक्षित आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केल आहे. पोलिस भाजप मुख्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ
BJP victory Maval: मावळच्या राजकारणात ट्विस्ट! स्पष्ट बहुमत असूनही राष्ट्रवादीचा पराभव, बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम, श्वान पथके आणि बॉम्ब शोधक पथकांना पाचारण करण्यात आले आहे. भाजप मुख्यालयाबाहेर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणच्या ढिगाऱ्यातून नमुने गोळा करण्यात येत आहेत. स्कूटर कोणाची होती आणि स्फोटाचे नेमके कारण काय होते? हे पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण चंदीगडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ
BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com