BJP victory Maval: मावळच्या राजकारणात ट्विस्ट! स्पष्ट बहुमत असूनही राष्ट्रवादीचा पराभव, बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

Political impact of Maval election: मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. स्पष्ट बहुमत असूनही भाजपचे सुभाष जाधव विजयी झाले आहेत.
Political impact of Maval election
Political impact of Maval electionsaam tv
Published On

मावळ तालुक्यातील राजकारणात मोठा उलटफेर झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यात स्पष्ट बहुमत असतानाही भारतीय जनता पक्षाचे सुभाष जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलवडे यांचा पराभव करत सभापतीपदावर विजय मिळवला आहे. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलल्याची चर्चा सुरू झालीये.

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याचं चित्र यापूर्वी स्पष्ट झालं होतं. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये १५ पैकी १५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. तसंच लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीवरही राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष असला तरी तोही सुनील शेळके यांच्या पाठबळावर निवडून आल्याचं मानलं जातंय. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड असल्याचं चित्र होतं.

Political impact of Maval election
Crime: आठवीच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रांकडून सामूहिक बलात्कार, व्हिडीओ बनवला अन् व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला

या सर्व पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. स्पष्ट बहुमत असूनही पक्षाचा पराभव झाल्याने अंतर्गत फूट उघड झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीच त्यांच्या संचालकांवर गंभीर आरोप करत सहा मते फुटल्याचा दावा केला आहे. संबंधित संचालकांनी प्रत्येकी वीस हजार रुपये घेऊन मते विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Political impact of Maval election
Pune News: राम नवमीची मिरवणूक पाहायला गेलेल्या महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू

सुभाष जाधव यांच्याकडून आरोपांचं खंडन

विजयी उमेदवार सुभाष जाधव यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलंय. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार झालेला नाही. सर्व अठरा संचालक सक्षम असून, त्यांनी स्वेच्छेने मतदान केलंय. माझ्यावर विश्वास आणि प्रेम करणाऱ्या संचालकांनी मला मतदान केलं आणि मी ११ मतांनी विजयी झालो, असं त्यांनी म्हटलंय. तसंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला असला तरी बाजार समितीचा हा विजय कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.

Political impact of Maval election
Devendra Fadnavis: लॉकडाऊनची अफवा पसरवाल तर खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

या निकालामुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार सुनील शेळके यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत मतभेदांमुळे विरोधकांना संधी मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. यानंतर तालुक्यातील राजकीय वारे बदलू लागल्याची चर्चा रंगू लागलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com