केंद्र सरकारने ८ उच्च न्यायालयांसाठी नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली
सुप्रीम कोर्टच्या शिफारशींनंतर या नियुक्त्यांना केंद्राची मंजुरी मिळाली
या नियुक्त्यांमुळे संबंधित उच्च न्यायालयांना नवीन नेतृत्व मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये आठ नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत या नियुक्त्यांची माहिती दिली.
केंद्राच्या निर्णयानुसार, दिल्ली उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्ती वल्लुरी कामेश्वर राव यांची पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे यांची कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांना राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची बॉम्बे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा राम मोहापात्रा यांना छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
गुजरात उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अलपेश यशवंत कोग्जे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू-कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी आणि त्यानंतर केंद्र सरकारकडून झालेल्या या नियुक्त्यांमुळे देशातील संबंधित उच्च न्यायालयांच्या न्यायालयीन प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार आहे.
न्यायमूर्ती वल्लुरी कामेश्वर राव – पटना उच्च न्यायालय
न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे – कोलकत्ता उच्च न्यायालय
न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल – राजस्थान उच्च न्यायालय
न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी – मुंबई उच्च न्यायालय
न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
न्यायमूर्ती कृष्णा राम मोहापात्रा – छत्तीसगड उच्च न्यायालय
न्यायमूर्ती अलपेश यशवंत कोग्जे – मध्य प्रदेश उच्च न्यायालय
न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी – जम्मू-कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.