Kalyan Latur Expressway : कल्याणवरून लातूरला पोहचा फक्त ४ तासांत, नवा महामार्ग होतोय तयार; कुठून कसा करता येणार प्रवास?

Kalyan Latur Expressway Update News : कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेचा ४४२ किमीचा सहापदरी प्रकल्प; ३५ हजार कोटींची अंदाजे गुंतवणूक, माळशेज घाटात ८ किमी बोगदा आणि प्रवासाचा वेळ ४ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता.
Kalyan latur Expressway News
Kalyan latur Expressway News AI Image
Published On
Summary
  • कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील

  • ४४२ किमी लांबीचा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे

  • प्रकल्पाची अंदाजे किंमत ३५ हजार कोटी रुपये

  • कल्याण–लातूर प्रवासाचा वेळ १०–११ तासांवरून सुमारे ४ तासांपर्यंत

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे ४४२ किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारण्याचा प्रस्ताव असून, या प्रकल्पाची अंदाजे किंमत तब्बल ३५ हजार कोटी रुपये आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

कल्याणहून लातूरला जाण्यासाठी सुमारे १० ते ११ तासांचा वेळ लागतो. मात्र, हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या चार तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यातील नागरिकांसह उद्योग आणि मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. या एक्सप्रेसवेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माळशेज घाट परिसरात तब्बल ८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे घाटातील वळणावळणाचे रस्ते, चढ-उतार आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.

Kalyan latur Expressway News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

कल्याणपासून सुरू होणारा हा महामार्ग मुरबाड, माळशेज घाट, ओतूर-आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंभा आणि अंबाजोगाई मार्गे लातूरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर एकूण १७ इंटरचेंज प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे, हा एक्सप्रेसवे राज्यातील अनेक महत्त्वाच्या महामार्ग आणि कॉरिडॉरशी जोडला जाणार आहे. दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार–जेएनपीटी लिंकशी तसेच विरार–अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरशी जोडणी झाल्यावर नवी मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि जेएनपीटी बंदरापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.

Kalyan latur Expressway News
Limbu Pani Benefits : किडनी स्टोन सारख्या आजारांवर बेस्ट उपाय, लिंबू पाणी पिण्याचे 'हे' ६ फायदे जाणून घ्या

लातूरच्या दिशेने या एक्सप्रेसवेची नागपूर–गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेशी जोडणी आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा यांच्यातील संपर्क आणखी मजबूत होणार आहे. तसेच सूरत–चेन्नई आर्थिक कॉरिडॉरशी जोडणी झाल्यास दक्षिण भारताकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही मोठा फायदा मिळू शकतो. एकूणच, कल्याण–लातूर एक्सप्रेसवे हा केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारा प्रकल्प नसून मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com