केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत एक महत्वाची माहिती दिली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार आता सरकारी कर्मचारी वैद्यकीय सुविधांसाठी म्हणजेच मेडिक्लेम सुविधा आपले आई वडील किंवा सासू सासरे यांपैकी एकाची निवड करू शकतात. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या आरोग्य नियोजनासाठी मोठी मदत होणार आहे. यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे पुरुष कर्मचाऱ्याला हा पर्याय निवडण्याची संधी केवळ एकदाच मिळेल. जर कर्मचाऱ्याने एकदा आपल्या आई-वडिलांचे मेडिक्लेमसाठी निवड केली तर भविष्यात तो बदल करून सासू सासऱ्यांचे नाव टाकून शकत नाही. महत्वाचे म्हणजे आई वडिलांचे निधन झाले त्यानंतर देखील तो सासू सासऱ्यांचे नाव त्यामध्ये टाकू शकत नाही. हीच अट सासू संसऱ्यांचे नाव जोडण्याच्या वेळी देखील लागू होईल.
CGHS नियमांनुसार कुटुंब (Dependent) कोणाला मानले जाईल?
मुले: मुलगा २५ वर्षांचा होईपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत, मुलगी लग्न होईपर्यंत.
७ व्या वेतन आयोगानुसार CGHS शुल्ककर्मचाऱ्यांच्या वेतन स्तरानुसार (Pay Level) दरमहा पगारातून ठराविक रक्कम कपात केली जाते
CGHS क्षेत्रात राहणारे ओपीडी (OPD) आणि आयपीडी (IPD) अशा दोन्ही सुविधांचा लाभ घेऊ शकतात. नॉन-CGHS क्षेत्रात राहणारे त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर ते प्रत्येक महिन्याला निश्चित वैद्यकीय भत्ता (FMA) घेऊ शकतात किंवा जवळच्या CGHS शहरात नोंदणी करून वैद्यकीय सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
सरकारचे हे स्पष्टीकरण अशा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे जे आपल्या सासू-सासऱ्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, हा 'वन-टाइम ऑप्शन' असल्याने निवड करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, कारण एकदा केलेली निवड नंतर बदलता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.