8th Pay Commission: 8वा वेतन आयोग रखडणार? कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आठवा वेतन आयोग रखडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये आले आहेत.
8th Pay Commission: 8वा वेतन आयोग रखडणार? कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये
8th Pay CommissionSaam Tv
Published On
  • ८वा वेतन आयोग कधी लागू होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत

  • महागाईमुळे ८वा वेतन आयोग रखडणार असल्याचे सांगितले जात आहे

  • पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी

  • मोदी सरकारचा खर्च कमी करण्याचा निर्णय

गिरीष निकम, साम टीव्ही

युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे सावट निर्माण झालंय. याचा फटका भारतीयांना बसतोय. अशातच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं टेन्शन वाढलंय. त्यामागे नक्की काय कारण आहे? पाहूया एक रिपोर्ट...

आखाती युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट निर्माण झालंय. इतकंच नाही तर आता अमेरीका-इराण युद्धामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचं टेन्शन वाढलंय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्याचं आणि काटकसरीचं आवाहन केलंय. इंधनाची बचत, अनावश्यक परदेशवारी आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केलंय. केंद्र सरकार सध्या मोठा खर्च पेलण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच आठवा वेतन आयोग रखडणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग रखडणार? कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

8वा वेतन आयोग रखडणार?

- अमेरिका-इराण युद्धामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याचा धोका

- वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागणार

- परकीय चलन वाचवण्याचे पंतप्रधान मोदींचं आवाहन

- सरकारी तिजोरीवर वार्षिक 4 लाख ते 9 लाख कोटींचा बोजा पडणार

- 8व्या वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशींची मंजुरी लांबणीवर पडण्याची शक्यता

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग रखडणार? कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये
8th Pay Commission: ६ टक्के पगारवाढ बेसिक सॅलरी ६९,००० अन् बरंच काही; फिटमेंट फॅक्टरबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि अंदाजे 69 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांची रचना बदलणार आहे. आणि त्याचा अहवाल पुढच्या वर्षी सादर होणार आहे. मात्र मध्य-पूर्व आशियातील युद्धामुळे देशांतर्गंत अर्थव्यवस्थेवर परीणाम होत आहे. त्यामुळे आठवा वेतन आयोगाचा अतिरीक्त भार सरकारला पेलणार आहे का? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खिसा सध्यातरी भरला जाणार नाही, अशीच चिन्हे आहेत.

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग रखडणार? कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com