8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात वेतनवाढीच्या फॉर्म्युलाबाबत चर्चा होत आहे. फॅमिली युनिट ५ करण्याची मागणी केली जात आहे. जर असे केले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगात पगारवाढीबाबत अपडेट

फॅमिली युनिट ५ करण्याची मागणी

केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, पगारवाढीसाठी कर्मचारी संघटनांनी काही मागण्या केल्या आहेत. याचसोबत वेतनवाढीसाठी नवीन फॉर्म्युलाचा प्रस्तावदेखील दिली आहे. कर्मचारी संघटनांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढेल?

कर्मचारी संघटनांनी सरकारने ३ फॅमिली युनिटऐवजी ५ फॅमिली युनिट करण्याची मागणी केली आहे.संघटनांच्या म्हणण्यांनुसार, या महागाईच्या काळात लहान कुटुंबाची संकल्पना ही वास्तवापासून दूर आहे.

३ फॅमिली युनिट फॉर्म्युला काय आहे?

कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्यावर अवलंबून असतो. परंतु मूळ वेतनाचा पाया हा फॅमिली युनिटवर अवलंबून असतो.सध्या सातव्या वेतन आयोगापर्यंत सरकारचा विश्वास होता की, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फक्त ३ जण असतात. स्वतः कर्मचारी, पत्नी आणि मुले. या तीन घटकांच्या आधारे राहणीमानाचा खर्च मोजला जातो आणि मूळ वेतन निश्चित केले जाते. सध्या मूळ वेतन १८००० रुपये आहे.

५ फॅमिली युनिटची मागणी का आहे?

ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉइज फेडरेशनसह अनेक संघटनांनी याबाबत युक्तीवाद केला आहे. आज मध्यमवर्गीय कुटुंबाची रचना बदलली आहे. कर्मचाऱ्यांची जबाबदारी फक्त पत्नी आणि मुलांपुरती मर्यादीत नसून पालकांसाठीही आहे. त्यामुळे फॅमिली युनिटमध्ये कर्मचारी, पत्नी, २ मुले आणि पालक असे मानले पाहिजे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आता १० वर्षांनी नाही तर दर ५ वर्षांनी पगार वाढणार? सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता

पगारात काय फरक होईल? (8th Pay Commission Salary Hike)

५ फॅमिली युनिट लागू केल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. सध्या ६००० प्रति युनिटनुसार ३ जणांसाठी १८००० रुपये मूळ वेतन आहे. आठव्या वेतन आयोगात ५ युनिटसाठी ३०,००० रुपये मिळते. यामध्ये महागाई भत्ता आणि इतर खर्च जोडला तर बेसिक सॅलरी ५५,००० ते ६०,००० रुपये होईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com