Siddhi Hande
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. दर दहा वर्षांनी हा वेतन आयोग लागू होतो.
आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात पगारवाढ येण्यात अजून वेळ लागणार आहे. मात्र, या कालावधीसाठी एरियर मिळणार आहे.
आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी, महागाई भत्ता, एचआरए यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचारी संघटनांनी सध्याची बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ६९,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
फिटमेंट फॅक्टर २.५७ वरुन ३.८३ ते ४.० करण्याची मागणी केली जात आहे. यावरच तुमचा पगार किती वाढणार हे निश्चित केले जाते.
महागाई भत्ता मूळ पगारात विलीन करण्याची मागणी केली जात आहे. घरभाडे भत्ता १० ते ३६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची मागणी आहे.
दरम्यान, आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व गोष्टी विचारात घेऊन शिफारसी सादर करणार आहे.
शिफारसी सादर केल्यानंतर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळेल. त्यानंतर प्रत्यक्षात आठवा वेतन आयोग लागू होईल.