Sakshi Sunil Jadhav
दहावीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकाल कधी लागणार असा प्रश्न पडला आहे.
महत्वाची बाब म्हणजे मागच्या वर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्यात लागला होता. त्यामुळे विद्यार्थांची धाकधूक वाढली आहे.
पुढील माहितीत आपण १० वीचा निकाल कसा पाहायचा? याच्या अगदी सोप्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट २०२६ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत mahahsscboard.in किंवा sscresult.mahahsscboard.in वर जावं लागेल.
पुढे तुम्हाला View SSC Result या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
आता तुम्हाला विद्यार्थ्याचा रोल नंबर, आईचे नाव लिहावे लागेल आणि सबमिट करावे लागेल.
पुढे लगेचच तुम्हाला रिझल्ट ओपन झालेला दिसेल. तिथून तुम्ही तुमचे गुण पाहू शकता.
महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल हा सर्वप्रथम डिजीलॉकरवर अपडेट केला जाईल . निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी, बोर्ड एका अधिसूचनेद्वारे निकालाची तारीख आणि वेळ कळवेल.