Sakshi Sunil Jadhav
Jio त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच परवडणारे आणि जास्त सुविधा मिळवून देणारे रिचार्ज प्लान आणत असतं.
पुढील ८४ दिवसांचा प्लानही तसाच आहे. यामध्ये तुम्हाला दिवसाला ५.३ रुपयांचा खर्च येऊ शकतो.
जिओचा हा रिचार्ज प्लान खास असण्याचं कारण म्हणजे इतर प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला दिवसाला १० ते १५ रुपये खर्च करावे लागतात.
Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला डेटा मिळत नाही. तरीही तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
Jioच्या या रिचार्जची किंमत ही एकूण ४४८ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात.
तुम्हाला Jioच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळतात. तसेच १००० एसएमएस मिळतात. या प्लॅनसोबत टेलिकॉम कंपनी जिओएआयक्लाउड आणि JioTV चे सबस्क्रिप्शन फ्री मिळतं.
Jioचा हा टेलिकॉम ऑपरेटरचा एक व्हॉईस-ओन्ली प्रीपेड प्लॅन आहे.
ग्राहकांना त्यांच्या प्रीपेड प्लॅनसोबत जर डेटा नको असेल, तर त्यांच्यासाठी व्हॉईस-ओन्ली प्रीपेड प्लॅन्स सुरू करण्यात आले आहेत.