Manasvi Choudhary
सायंकाळी काहीतरी चटपटीत पौष्टिक खायचं असेल तर तुम्ही पालक कटलेट बनवू शकता.
कुरकुरीत पालक कटलेट चवदार लागतात. तुम्हालाही पालकची भाजी खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही पालक कटलेट रेसिपी ट्राय करा.
पालक कटलेट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पालक कटलेट बनवण्यासाठी पालक, बटाटे, बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, जिरा पावडर, चाट मसाला, लाल मसाला, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरा. त्यानंतर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या.
एका भांड्यात बारीक चिरलेला पालक आणि उकडलेले बटाटे हे मिश्रण एकत्र करा. मिश्रणात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, सर्व मसाले, मीठ आणि बेसन घालून व्यवस्थित मळून घ्या.
तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना कटलेटचा किंवा टिक्कीचा आकार द्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तयार कटलेट फ्राय करा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा.