Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला पौष्टिक पदार्थाचे सेवन केल्यास संपूर्ण दिवस शरीराला ऊर्जा मिळते.
कुरकुरीत पोहा वडे चवदार लागतात. तुम्हालाही कांदा पोहे खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही पोहे वडे रेसिपी ट्राय करा.
पोहे वडे घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पोहे वडे बनवण्यासाठी पोहे, तांदळाचे पीठ, गाजर, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, धना पावडर, आले, मसाला, हळद, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी पोहे स्वच्छ धुवून घ्या. भाज्या व्यवस्थित साफ करून बारीक चिरा.
गाजर किसून घेतल्यानंतर कांदा आणि सिमला मिरची बारीक करा. लसूण आणि मिरची याची एकत्र पेस्ट मिक्सरमध्ये करा.
एका भांड्यात भिजवलेले पोहे घ्या. पोह्यामध्ये तांदळाचे पीठ, बारीक केलेला गाजर, सिमला मिरची, कांदा, आले- लसूण पेस्ट, मसाले मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला.
संपूर्ण मिश्रण एकजीव करा आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये पोहा वडे फ्राय करा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यत पोहा वडे तळून घ्या.
अशाप्रकारे टोमॅटो सॉस, हिरवी चटणीसोबत कुरकुरीत पोहा वडे सर्व्ह करा.