DoT Telecom Rules: मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंग कॉलबाबत नवा नियम; १ नोव्हेंबरपासून काय बदलणार, जाणून घ्या!

Department of Telecommunications: दूरसंचार विभागाच्या CNAP सुविधेमुळे अनोळखी नंबरवरून फोन आल्यास कॉल करणाऱ्याचे नाव स्क्रीनवर दिसू शकते. ही सुविधा १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होण्याचे निर्देश आहेत. परदेशी कॉल, गोपनीयता आणि व्यावसायिक नावांसंबंधीचे नियम जाणून घ्या.
DoT Telecom Rules
DoT Telecom Rulessaam tv
Published On: 

मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला की तो कोणाचा आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल. अनेक जण नंबर ओळखण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सची मदत घेतात. मात्र आता अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर केवळ नंबरच नाही, तर फोन करणाऱ्या व्यक्तीचे नावही मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे.

दूरसंचार विभागाने (DoT) यासाठी कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) ही सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिलेत. ही सुविधा येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून देशभरातील 4G आणि त्यापुढील टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या मोबाईल नेटवर्कवर सुरू होणार आहे.

DoT Telecom Rules
DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार गुड न्यूज, महागाई भत्ता कितीने वाढणार?

काय आहे सरकारचा नवा आदेश?

या नव्या सुविधेमुळे तुमच्या मोबाईलवर फोन आल्यावर स्क्रीनवर सध्या दिसतो तसा नंबर झळकणार आहे. मात्र त्यासोबत फोन करणाऱ्या व्यक्तीचं नावही दिसून येणार आहे. ज्या व्यक्तीचा फोन आला आहे त्या व्यक्तीचा नंबर आधीपासून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केलेलं नाव दिसून येईल.

मात्र जर हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल तरीही नाव समजणार आहे. देशांतर्गत कॉलच्या बाबतीत फोन करणाऱ्या व्यक्तीच्या टेलिकॉम कंपनीकडे नोंद असलेलं नाव स्क्रीनवर दिसून येणार आहे. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेला फोन नेमका कोणाचा आहे, हे समजणं अधिक सोपं होणार आहे.

DoT Telecom Rules
Car tyre pressure: कारच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी?

परदेशातून येणाऱ्या कॉलच्या बाबतीत मात्र फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिसणार नाही. अशा वेळी मोबाईलच्या स्क्रीनवर ‘इंटरनॅशनल कॉल’ असं लिहून येणार आहे. ज्या युजर्सने कालिंग लाईन आयडेंटीफिकेशन रिस्ट्रिक्शन हा पर्याय निवडला असेल त्यांचं नाव दिसून येणार नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीने आपला नंबर किंवा ओळख समोरच्या व्यक्तीला दिसू नये असा पर्याय निवडलाय त्यांचं नाव स्क्रीनवर दिसणार नाही.

ऑपरेटर्सना डेटाबेस ठेवणं गरजेचं

प्रत्येक टेलिकॉम कंपनीला ग्राहकांच्या मोबाईल नंबरसोबत त्यांच्या नावाची नोंद करवून ठेवावी लागणार आहे. त्यावेळी जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला फोन करेल तेव्हा तुमची कंपनी त्या नंबरवरून फोन करणाऱ्याचे नाव शोधून तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे अनोळखी नंबरवरून फोन आला तरी फोन करणाऱ्याचे नाव समजू शकेल.

मात्र, ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षिततेवरही भर देण्यात आला आहे. फोनवर बोलणं झाल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कुठेही सेव्ह होणार याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. यासाठी ‘सिक्युरिटी-बाय-डिझाइन’ ही पद्धत वापरण्यास सांगितलंय. म्हणजेच, माहिती सुरक्षित राहील, याचा विचार सुविधा तयार करतानाच केला जाणार आहे.

व्यावसायिक ग्राहकांना नाव निवडण्याची मुभा

व्यवसायासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी मोबाईल कनेक्शन घेणाऱ्यांना या नियमात काही प्रमाणात सूट देण्यात आलीये. अशा ग्राहकांना टेलिकॉम कंपनीच्या नोंदीतील नावाऐवजी आपल्या व्यवसायाचं नाव दाखवता येणार आहे. मात्र यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील. संबंधित नाव ‘ट्रेड मार्क्स रजिस्ट्री’मध्ये रजिस्टर्ड ट्रेडमार्क असले पाहिजे किंवा जीएसटी पोर्टलवर रजिस्टर्ड व्यवसायाचं नाव असले पाहिजे.

DoT Telecom Rules
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ३ टक्क्यांनी वाढू शकतो महागाई भत्ता; पगार कितीने वाढणार?

हे नाव स्क्रीनवर दाखवण्यापूर्वी मोबाईल कंपनीला मूळ कागदपत्रे तपासून त्याची खात्री करावी लागणार आहे. तसंच CNAP संबंधित तक्रारींचं निराकरण करण्यासाठीही कंपन्यांना ठरावीक वेळेत काम करणारी सिस्टीम तयार करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com