

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
महागाई भत्ता ६० टक्क्यावरून ६३ टक्के होणार
मगागाई भत्ता वाढल्यास पगारात देखील मोठी वाढ होईल
जुलै २०२६ पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता आणि महागाई सवलतमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. यावर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने जर ३ टक्क्याला मंजुरी दिली तर महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत होईल. महागाई भत्त्याची ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होईल. पण सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.
जुलै २०२६ च्या महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन जानेवारी ते जून २०२६ पर्यंतच्या सीपीआय-आयव्ही म्हणजे इंडस्ट्रियल वर्कर्ससाठी कंज्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीवर आधारीत आहे. जून २०२६ चा सीपीाय-आयव्ही १५.१९ होता. या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता जवळपास ६३.७५ टक्के होतो. पण नियमानुसार कर्मचाऱ्यांना ६३ टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे. अशामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना ३ टक्क्यांचा फायदा होऊ शकतो.
महागाई भत्ता वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ५०,००० रुपये आहे. तर त्याला सध्या ६० टक्के दराने ३०,००० रुपये महागाई भत्ता मिळतो. जर ६३ टक्के महागाई भत्ता मिळाला तर ही रक्कम ३१,५०० रुपये होईल. म्हणजेच, त्यांना दरमहा महागाई भत्त्यात १५०० रुपये जास्त मिळतील. त्याचप्रमाणे, १८००० रुपयांच्या मूळ पगाराला दहमहा ५४० रुपयांची वाढ होईल आणि १ लाख मूळ वेतन असणाऱ्याला दरमहा ३००० रुपयांची वाढ मिळून जाईल.
महत्वाचे म्हणजे, नवीन महागाई भत्ता १ जुलै २०२६ रोजी लागू होण्याची अपेक्षा आहे. जर सरकारने महागाई भत्त्याची घोषणा केली तर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता मिळेपर्यंतच्या महिन्यापर्यंतची थकबाकी देखील मिळू शकते. जर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबरमध्ये मिळाला तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यांची थकबाकी मिळेल. थकबाकीचे पैसे हे सरकारच्या अंतिम आदेश आणि प्रक्रियेवर अवलंबून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.