

DA Hike Updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या महागाई भत्त्याच्या (DA) पुढील हप्त्याच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या डीए वाढीची अधिकृत घोषणा अद्याप केंद्र सरकारकडून झालेली नाही. दरम्यान, देशात दुर्गापूजा आणि दसऱ्याचा सण जवळ आल्याने सरकारकडून त्याआधीच डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉयी फेडरेशनचे अध्यक्ष मंजीत सिंह पटेल यांच्या म्हणण्यांनुसार, जुलै मधल्या डीएची घोषणा दसऱ्याआधी होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारात वाढीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा केलेली नाही.
यावेळी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. जर ४ टक्के वाढ झाली, तर सध्याचा ६० टक्के DA वाढून ६४ टक्के होऊ शकतो. या निर्णयाचा थेट फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना होण्याची शक्यता आहे.
याआधी जानेवारीच्या DA सायकलमध्ये २ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला होता.
दरम्यान, कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (इंडस्ट्रियल वर्कर्स) मध्ये १.२ अंकाची वाढ झाली असून तो १५४.४० वर पोहोचला आहे. डीए आणि डीआरच्या गणनेत या महागाईच्या आकडेवारीला महत्त्व असतं.
ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे, त्यांना सध्या ६० टक्के डीएनुसार १०,८०० रुपये महगाई भत्ता मिळतो. डीए ६४ टक्के झाल्यावर हा भत्ता ११,५२० रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या मासिक डीएमध्ये ७२० रुपयांची वाढ होऊ शकते. पण ही वाढ अजून अपेक्षित असून अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून होणं बाकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.