8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार-पेन्शनबाबत मोठ्या मागण्या; 3.84 फिटमेंट फॅक्टरसह 5 वर्षांनी रिव्हिजनचा प्रस्ताव

Fitment Factor Update:आठव्या वेतन आयोगासमोर कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी ३.८३ ते ३.८४ फिटमेंट फॅक्टर, पाच वर्षांनी वेतन- पेन्शन रिव्हिजन, HRA वाढ आणि फॅमिली युनिट मर्यादा वाढवण्याची मागणी मांडली.
8th Pay Commission
8th Pay Commission meta ai
Published On

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोग सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आयोगाचा चंदीगड दौरा १६ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला असून या काळात कर्मचारी, पेन्शनधारक, संघटना आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा केली जाणार आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या दौऱ्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

याआधी आयोगाने चेन्नईमध्ये ७ आणि ८ सप्टेंबर, तर पुडुचेरीमध्ये ९ सप्टेंबर रोजी विविध संघटना आणि संबंधित घटकांशी संवाद साधला. या बैठकांमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सॅलरी, पेन्शन तसेच इतर सेवासुविधांबाबत सूचना आणि मागण्या ऐकून घेतल्या जात आहेत.

फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत

आठव्या वेतन आयोगाबाबत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे फिटमेंट फॅक्टर. काही कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांनी तो जास्त ठेवण्याची मागणी केली आहे. काही संघटनांकडून ३.८३ ते ३.८४च्या आसपास फिटमेंट फॅक्टर सुचवण्यात आला आहे. मात्र, हा आयोगाचा अंतिम निर्णय नसून संघटनांनी केलेल्या मागण्या आहेत.

8th Pay Commission
Cancer : रात्री झोपताना तुम्हीही करताय का ही गंभीर चूक? कॅन्सरपासून वाचायचं असेल तर आत्ताच बदला सवय

दर ५ वर्षांनी वेतन-पेन्शन रिव्हिजन?

सध्या केंद्र सरकारच्या वेतन आयोगांच्या शिफारसी साधारणपणे १० वर्षांच्या अंतराने लागू होतात. केंद्र सरकारनेही 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात आयोगाला आपला अहवाल स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत सादर करण्याचे म्हटले आहे.

दरम्यान, कर्मचारी आणि पेन्शनर्सशी संबंधित काही संघटनांची मागणी आहे की वेतन आणि पेन्शनमधील सुधारणा दर ५ वर्षांनी व्हाव्यात. ही मागणी मान्य झाल्यास ३० वर्षांची सेवा असलेल्या कर्मचाऱ्याला सध्याच्या १० वर्षांच्या पद्धतीपेक्षा जास्त वेळा वेतन पुनर्रचनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, सध्या ही फक्त संघटनांची मागणी आहे.

8th Pay Commission
PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

HRA आणि फॅमिली युनिटमध्ये बदलाची मागणी

दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये सध्याचा HRA (घरभाडे भत्ता) पुरेसा नसल्याचे काही कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे HRA वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर फॅमिली युनिटची मर्यादा ३ वरून ५ करण्याची मागणीही पुढे आली आहे.

अनेक शहरांमध्ये आयोगाच्या बैठका

आठव्या वेतन आयोगाने दिल्लीसह लखनऊ, भुवनेश्वर, कोलकाता, श्रीनगर-जम्मू, चेन्नई, पुडुचेरी आणि चंदीगड अशा विविध ठिकाणी बैठका आणि संवाद आयोजित केले आहेत. आयोगाने पुढील काळात इतर शहरांमध्येही भेटी घेण्याचे नियोजन केले आहे. अधिकृत माहितीनुसार बेंगळुरूमध्ये ७ ते ८ ऑक्टोबर 2026 रोजी पुढील दौरा नियोजित आहे.

आठव्या वेतन आयोगाने अद्याप फिटमेंट फॅक्टर, नवीन वेतनश्रेणी किंवा HRA वाढीबाबत अंतिम शिफारस जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले आकडे हे विविध कर्मचारी व पेन्शनर्स संघटनांच्या मागण्या म्हणूनच पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com