Sakshi Sunil Jadhav
रात्री मोबाईल डोक्याजवळ किंवा उशाशेजारी ठेवण्याची सवय अनेकांच्या दैनंदिन लाइफस्टाइलचा भाग झाली आहे.
मोबाईलमधून रेडिओफ्रीक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा उत्सर्जित होते, त्यामुळे सततच्या एक्सपोजरबाबत चर्चा केली जाते.
फोन उशाजवळ ठेवल्याने थेट कॅन्सर किंवा ब्रेन ट्यूमर होतो, असा ठाम वैज्ञानिक निष्कर्ष सध्या उपलब्ध नाही.
रात्री मोबाईल वापरल्यामुळे सतर्कता वाढू शकते आणि झोप लागण्यास उशीर होण्याची शक्यता असते.
मोबाईलची स्क्रीन विशेषतः रात्री वापरल्यास झोपेच्या नैसर्गिक पद्धतीवर परिणाम होऊ शकतो.
झोपण्याआधी सतत रील्स, पोस्ट किंवा व्हिडिओ पाहिल्यामुळे मेंदू अधिक सक्रिय राहू शकतो.
रात्री गरज नसताना मोबाईल बेडपासून थोडा दूर ठेवणे ही चांगली सवय ठरू शकते.
शक्य असल्यास झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनपासून ब्रेक घ्या.