Car tyre pressure: कारच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी?

Surabhi Jayashree Jagdish

टायरमध्ये योग्य हवा

कारच्या टायरमध्ये योग्य हवा असल्यास टायर जास्त काळ टिकतात. यामुळे गाडीचं मायलेज चांगलं मिळतं. तसंच गाडीवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं आणि ब्रेक लावल्यावर गाडी व्यवस्थित थांबण्यास मदत होते.

Recommended tyre PSI | saam tv

किती हवा असावी?

कारच्या टायरमध्ये किती हवा भरावी याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. प्रत्येक कारच्या टायरमध्ये हवेचे प्रमाण सारखं नसतं. त्यामुळे आपल्या कारच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी हे जाणून घेणं गरजेचं आहे.

Tyre pressure guide | saam tv

किती PSI हवा भरावी?

टायरमध्ये किती हवा असावी, हे कारचे मॉडेल आणि टायरचा आकार यावर अवलंबून असतं. याची अचूक माहिती कारच्या मालकांसाठी दिलेल्या मॅन्युअलमध्ये मिळते. अनेक कारच्या टायरमध्ये 30 ते 35 PSI हवा असते तर काही कारसाठी 35 ते 40 PSI हवा योग्य असू शकते.

Ideal PSI for car tyres | saam tv

टायरमध्ये योग्य हवा नसल्यास काय होतं?

टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असल्यास गाडीच्या मायलेजवर परिणाम होऊ शकतो. यामुळे टायर लवकर झिजू शकतात आणि काही परिस्थितींमध्ये टायर फुटण्याचाही धोका असतो. तसंच गाडीवरील नियंत्रण कमी होऊ शकतं.

Tyre pressure and mileage | saam tv

हवा वेळोवेळी तपासा

कारच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे ठराविक अंतराने टायरमधील हवेची तपासणी करून घ्यावी. हवा कमी किंवा जास्त असल्यास कारसाठी दिलेल्या योग्य PSI प्रमाणानुसार ती भरून घ्यावी किंवा कमी करून घ्यावी.

Tyre wear and tear | saam tv

घरी कशी तपासावी?

टायरमधील हवेचं प्रमाण तपासण्यासाठी टायर प्रेशर गेजचा वापर करता येतो. हे उपकरण टायरच्या दुकानात किंवा गाडांची विक्री करणाऱ्या दुकानात मिळू शकतं. याच्या मदतीने टायरमध्ये किती PSI हवा आहे हे समजतं.

Tyre pressure gauge | saam tv

पोर्टेबल एअर इन्फ्लेटर

कारच्या टायरमध्ये घरीच हवा भरायची असल्यास पोर्टेबल एअर इन्फ्लेटर वापरता येतो. हे एक छोटं मशी असून त्याच्या मदतीने गरजेनुसार टायरमध्ये हवा भरता येते. मात्र हवा भरताना कारच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या PSI प्रमाणाचं पालन करावं.

Tyre pressure at home | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

7000 km engine oil change | saam tv
येथे क्लिक करा