Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

इंजिनला लुब्रिकेशन देणं

इंजिन ऑईल इंजिनमधील सर्व भागांना वंगण देतं, त्यामुळे त्यांच्यातील घर्षण कमी होतं. काही काळ वापरल्यानंतर ऑईलमध्ये घाण जमा होते आणि त्याची वंगण देण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे ठरलेल्या वेळेनुसार ऑईल बदलणं गरजेचं असतं.

when to change engine oil | saam tv

इंजिनला जास्त गरम होण्यापासून मदत

इंजिन ऑईल इंजिनमधील उष्णता कमी करण्यासही मदत करतं. ऑईल जुनं किंवा खूप घाण झालं तर उष्णता कमी करण्याची त्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे वेळेवर ऑईल बदलल्याने इंजिन जास्त गरम होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

engine oil replacement | saam tv

इंजिनची झीज

नियमितपणे ऑईल बदलल्याने इंजिनमधील भागांमधील घर्षण कमी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे इंजिनच्या भागांची झीज कमी होऊ शकते. यामुळे इंजिन चांगल्या स्थितीत राहू शकतं.

how often to change engine oil | saam tv

वेळेवर इंजिन ऑईल न बदलणं

ऑईल वेळेवर बदललं नाही तर इंजिनमधील भागांमध्ये जास्त घर्षण होऊ शकतं. त्यामुळे इंजिनच्या भागांची झीज वाढून इंजिन लवकर खराब होण्याची शक्यता असते. खूप काळ ऑईल बदललं नाही तर इंजिन जाम होऊन मोठ्या दुरुस्तीचा खर्च येऊ शकतो.

engine oil change kilometres | saam tv

गाडीच्या परफॉर्मन्सवर परिणाम

जुनं ऑईल इंजिनला पुरेशी उष्णता कमी करण्यास मदत करू शकत नसेल तर इंजिन जास्त गरम होऊ शकतं. याचा परिणाम गाडीच्या कामगिरीवर होऊन इंजिनची पॉवर आणि मायलेज कमी होऊ शकतं.

7000 km engine oil change | saam tv

मॉर्डन गाड्यांमध्ये ऑईल जास्त काळ चालतं

काही आधुनिक गाड्यांमध्ये सिंथेटिक ऑईल वापरलं जातं आणि ते सामान्य ऑईलपेक्षा जास्त काळ वापरता येऊ शकतं. अशा गाड्यांमध्ये १०,००० ते १५,००० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतराने ऑईल बदलण्यास सांगितलं जातं. मात्र हे अंतर गाडीच्या कंपनीच्या मॅन्युअलनुसारच ठरवावं.

15000 km engine oil change | saam tv

किती किलोमीटरनंतर इंजिन ऑईल बदलायचं?

साधारणपणे कारचं इंजिन ऑईल ७,००० ते १०,००० किलोमीटरनंतर बदलण्याचा सल्ला दिला जातो. सतत जड ट्रॅफिकमध्ये किंवा ऑफ-रोडिंगमध्ये गाडी चालवत असल्यास, काही गाड्यांमध्ये ५,००० किलोमीटरनंतर ऑईल बदलण्याची गरज पडू शकते.

synthetic engine oil | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG bike | saam tv
येथे क्लिक करा