Miachel Mosley: प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर डॉ मायकेल मॉस्ले यांचा मृतदेह ग्रीक बेटावर सापडला; सुट्टीवर असताना झाले होते बेपत्ता

Michael Mosley: TV presenter found dead on Greek island, wife confirms; प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर डॉ. मायकेल मॉस्ले यांचा मृतदेह सापडला आहे. सुट्टयांवर फिरायला गेले असताना ते अचानक बेपत्ता झाले होते.
Miachel Mosley
Miachel MosleySaam Tv

प्रसिद्ध ब्रिटिश टीव्ही प्रेझेंटर डॉ. मायकेल मॉस्ले (Miachel Mosley) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाले होते. त्यांचामृतदेह अखेर सापडला आहे. डॉ. मायकेल मॉस्ले हे ६७ वर्षाचे होते. बुधवारी फिरायला गेले असताना ते अचानक गायब झाले. गायब झाल्यानंतर काही दिवसांनी मायकेल यांना शोधण्यात यश आले आहे.

मायकेल मॉस्ले हे सिमी येथी ग्रीक आयलँडवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या आयलँडवरुन ते परत घरी आलेच नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर या आयलँडच्या परिसरात शोधकार्य सुरु झाले. अग्नीशमन दल, तटरक्षक दल यांच्या प्रयत्नानंतर मायकेल यांना शोधण्यात यश आले आहे.

मॉस्ले हे ब्रिटीश प्रसारमाध्यमातील (British Media)लोकप्रिय चेहरा होते. त्यांनी अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ते बीबीसी रेडिओ ४ वर 'जस्ट वन थिंग' या नावाचा कार्यक्रम चालवायचे. मोस्ले हे निकोलाओस समुद्रकिन्याऱ्यावरुन फिरण्यासाठी गेले होते. तिथेच ते बेपत्ता झाले. पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.

Miachel Mosley
Sonakshi Sinha: बॉलिवूडची दबंग गर्ल बॉयफ्रेंसोबत अडकणार लग्नबंधनात; तारीख आली समोर

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मॉस्ले हे चालत जाताना दिसले परंतु ते पुन्हा रिटर्न येताना दिसले नाही. त्यामुळे पोलिसांना शोध घेण्यास अवघड झाले होते. मात्र, त्यांचा मृतदेह आता सापडला आहे.

Miachel Mosley
Kangana Ranaut: इंदिरा गांधींसोबत काय झालं होतं आठवतंय ना? कंगना रणौत मारहाण प्रकरणावर शबाना आझमींची प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com