Raveena Tandon Controversy: "आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही...", क्लीन चिट मिळाल्यावर रवीना टंडनने शेअर केली पोस्ट

Raveena Tandon On Bandra Road Rage Incident: रवीना टंडन आणि तिच्या कार ड्रायव्हरवरचा वांद्रातील व्हिडीओचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अभिनेत्रीला आणि तिच्या ड्रायव्हरला आता क्लिनचीट मिळालेली आहे.
Raveena Tondon : "आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही...", क्लीन चिट मिळाल्यावर रवीना टंडनने शेअर केली पोस्ट
Raveena TandonSaam TV

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) सध्या चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रवीना टंडन आणि तिच्या कार ड्रायव्हरवरचा वांद्रातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रवीना आणि तिच्या ड्रायव्हरने तीन महिलांना धक्का दिल्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे तिला ट्रोलही केलं होतं.

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेचं सर्व सत्य समोर आलं आहे. या प्रकरणी अभिनेत्रीला आणि तिच्या ड्रायव्हरला आता क्लिनचीट मिळालेली आहे. क्लिनचीट मिळाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Raveena Tondon : "आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही...", क्लीन चिट मिळाल्यावर रवीना टंडनने शेअर केली पोस्ट
Aditi Sarangdhar : आदिती सारंगधरला लागलेले विचित्र डोहाळे, स्वत:च केला खुलासा

"प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार. 'मोरल ऑफ द स्टोरी ?' आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही बाहेर ठेवून द्या...", असं तिने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय. रवीना टंडनने इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांचे मनापासून आभार मानलेत.

१ जूनच्या रात्री रवीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रवीनाला आणि तिच्या ड्रायव्हरला तेथील काही स्थानिक लोकांनी घेरलेलं दिसत आहे. त्यांनी अभिनेत्रीवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच रवीना मद्यधुंद असल्याचाही आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

Raveena Tandon Instagram Story
Raveena Tandon On Road Incident In MumbaiSaam TV

दरम्यान, या फुटेजेसची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आढळून आले की, रवीनाचा ड्रायव्हर कार रिव्हर्स घेत सोसायटीमध्ये नेत होता. तर ते संबंधित कुटुंबही त्यावेळी तिथून जात होते. त्यानंतर या कुटुंबाने गाडी थांबवत ड्रायव्हरला गाडी रिव्हर्स घेण्यावरून ओरडू लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Raveena Tondon : "आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही...", क्लीन चिट मिळाल्यावर रवीना टंडनने शेअर केली पोस्ट
Munjya Twitter Review : साधे सरळ कथानक आणि उत्तम मांडणी..., शर्वरी वाघचा 'मुंज्या' हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com