IPL 2024: आणखी एका ब्रिटीश खेळाडूचा आयपीएल खेळण्यास नकार; काय आहे कारण?

IPL 2024 England Pacer : यंदाच्या आयपीएलमधून आणखीन एका इंग्लंडच्या खेळाडूने आपले नाव माघारी घेतलं आहे.एकामागून एक खेळाडू आयपीएल खेळण्यास नकार देत असल्याने आयपीएल फ्रँचायझीला दुसरा मोठा धक्का बसलाय. याआधीच या संघातील एका क्रिकेटरने या स्पर्धेतून माघार घेतली.
England Pacer David Willey  Withdraws
England Pacer David Willey Withdrawsyandex

Ipl 2024 England Pacer David Willey Withdraws:

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमधून नाव मागे घेण्याचं सत्र चालूच आहे. याआधी पाच मोठ्या ब्रिटिश खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला. आता या यादीत असून एका खेळाडूचे नाव जुडले आहे.नाव मागे घेणार ब्रिटीश क्रिकेट लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. दरम्यान याआधी या फ्रँचायझीमधून मार्क वुडने देखील त्याचे नाव मागे घेतले आहे, यामुळे या संघाला दोन धक्के बसले आहेत. (Latest News)

लखनऊ सुपर जायंट्सचे नवे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी ही माहिती दिलीय. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली आगामी आयपीएल हंगामातील काही सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याची माहिती लॅगर यांनी दिली. दरम्यान याआधी मार्क वुड, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, जेसन रॉय या बड्या खेळाडूंनीही आपली नावे मागे घेतली आहेत. इंग्लंडच्या खेळाडूंवर कारवाई करावी का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते पण आता पुन्हा या यादीत नव्या नावाची भर पडली आहे.

प्रशिक्षक जस्टिन लॅगर यांच्या मते, विली हा काही सामन्यांसाठीच नसणार आहे. आयपीएलच्या मध्यापर्यंत तो परत संघात येऊ शकतो. आयपीएल २०२४ च्या लिलावात फ्रँचायझीने त्याला २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीवर करारबद्ध केलं होतं. यापूर्वी मार्क वुडने संपूर्ण मोसमातून आपले नाव मागे घेतले होते. त्याच्या जागी फ्रँचायझीने शामर जोसेफला करारबद्ध केले आहे.

'मार्क वुडने संपूर्ण स्पर्धेतून आपले नाव मागे घेतलंय. तर डेव्हिड विली देखील अद्याप येऊ शकलेला नाही. त्यामुळे आम्हाला अनुभवाची कमतरता जाणवत आहे.'' उल्लेखनीय आहे की, विलीने नुकतेच पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) सर्व सामने खेळले होते. तो लीगपासून फायनलपर्यंत सतत खेळताना दिसला. मात्र आता त्याने आयपीएलमधून आपले नाव काढून घेतले आहे. तो कधी परतणार हे पाहावे लागेल असं प्रशिक्षक जस्टिन लॅगर म्हणालेत.

England Pacer David Willey  Withdraws
IPL 2024: धोनी फटकेबाजी करण्यास तयार; ब्राव्होला मारलेला षटकार पाहून आरसीबीला फुटेल घाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com