आयपीएलचं १७ वं सत्र २२ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मध्ये होणार आहे.चेन्नईचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. यंदाचे आयपीएलमध्ये दमखम दाखवण्यास आणि आपल्या बॅट धावांचा पाऊस पाडण्यासाठी धोनीने जोरदार तयारी केलीय. याचा अंदाज चेन्नईच्या सराव सामन्यात मारलेला षटकार पाहून येईल. (Latest News)
धोनी आयपीएलच्या शेवटच्या मोसमात शेवटचा ॲक्शन करताना दिसला होता आणि आता तो १७ व्या मोसमात पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. ४२ वर्षीय क्रिकेटरही आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करण्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडणार नसल्याचं दिसत आहे.धोनीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.या सराव सामन्यात ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करत आहे तर एमएस धोनी फलंदाजी करताना दिसत आहे. ब्राव्होने लेन्थ बॉल टाकला या बॉलवर धोनीने लाँग-ऑनवर षटकार मारला.
चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर नेला. यानंतर धोनी दोन्ही हातवर करून विकेट्सच्या मागे जाऊन सेलिब्रेशन करताना दिसला. धोनीचा फटका पाहून ब्राव्होला दोन्ही हातांनी चेहरा लपवावा लागला. आयपीएलच्या सामन्यात धोनी अशाचप्रकारे फटेकबाजी करणार असल्याचं यातून दिसत आहे.सराव सामन्यातील धोनीचा हा षटकार पाहून सीएसके चाहतेटोळी नक्कीच मारतील तर त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना हा फटका पाहून घाम फुटल्याशिवाय राहिला नसेल. दरम्यान चेन्नईचा पहिला सामना बेंगळुरूच्या संघाविरुद्धात होणार आहे.
IPLच्या सामन्यांपूर्वी महेंद्रसिंग धोनीचं वाढलं टेन्शन
चेन्नईचे दोन खेळाडून पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. यामुळे कर्णधार धोनीचं थोडसं टेन्शन वाढलंय. संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना दुखापतीमुळे स्पर्धेतील किमान पहिल्या ३-४ सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत.न्यूझीलंडचा फलंदाज कॉनवेने गेल्या वर्षी ६०० धावा केल्या होत्या, ज्यामुळे तो CSK चा सर्वात यशस्वी फलंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.