ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना २०२४ च्या झालेल्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झालाय. कीर स्टारमर यांच्या नेतृत्वाखालील विरोधी मजूर पक्षाने आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलचे अंदाज देखील मजूर पक्षाच्या बाजूने होते. ऋषी सुनक यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. खुद्द सुनक यांनीच पराभव स्वीकारला आहे.
यूके निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार (Britain Election) पडली. मजूर पक्षाने दणक्यात विजयाकडे वाटचाल केली आहे. या पराभवाची जबाबदारी खुद्द सुनक यांनी स्वत:च स्वीकारली आहे. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि किर स्टाररचे विजयाबद्दल अभिनंदन करतो, असं देखील सुनक म्हणाले (UK Election) आहेत.
बहुमताचा आकडा किती?
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ६५० खासदारांसह बहुमत सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला ३२६ जागांची आवश्यकता आहे. पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. कंझर्व्हेटिव्ह पक्ष (Rishi Sunak) मागील १४ वर्षांपासून सत्तेत होता. आतापर्यंत ६५० पैकी २१३ जागांचे निकाल जाहीर झालेत. मजूर पक्षाने १५९ जागा जिंकून आघाडी घेतली. त्याचवेळी सुनक यांच्या पक्षाला केवळ २६ जागा मिळाल्यात.
कंझर्व्हेटिव्ह पक्ष गेल्या चौदा वर्षांपासून सत्तेत होता. या पराभवाने पक्षाला मोठा धक्का बसलाय. लेबर पार्टीला बहुमत मिळत असल्याचं दिसताच पंतप्रधान ऋषी सुनक यांनी माध्यमांसमोर पक्षाचा पराभव मान्य ( Labour Party Keir Starmer) केलाय. विजयाबद्दल सुनक यांनी लेबर पार्टीचे अभिनंदन केलंय. चौदा वर्षानंतर ब्रिटनमध्ये सत्ताबदल झाल्याचं दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.