Political News : महिला IAS अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अटक; 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Tamilnadu Political news : तामिळनाडूमध्ये महिला IAS अधिकाऱ्याच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून TVK आमदार सी. अरुल विग्नेश यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
TVK MLA C. Arul Vignesh has been arrested
TVK MLA C. Arul Vignesh has been arrestedAI Image
Published On: 

तामिळनाडूमध्ये महिला IAS अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून सत्ताधारी तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे आमदार सी. अरुल विग्नेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर चार तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या त्यांची रवानगी कुड्डालोर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आमदार विग्नेश यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात आमदारांनी त्यांच्या कपड्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

TVK MLA C. Arul Vignesh has been arrested
Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

एवढेच नाही, तर व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवणे आणि रात्रीच्या वेळी महिला अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मात्र, आमदार विग्नेश यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात राजकीय हेतूने आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयानेही सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तक्रारीवर कारवाई करण्यास विलंब होत असल्याबद्दल न्यायालयाने प्रशासनाला जाब विचारला होता.

TVK MLA C. Arul Vignesh has been arrested
Breaking News : उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली; चेन्नई दौरा रद्द

त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली. यावरून कल्लाकुरिची येथील महिला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75, 78, 79 आणि 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तिरुप्पूरच्या पोलीस अधीक्षक सृष्टि सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 22 डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

TVK MLA C. Arul Vignesh has been arrested
Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

दरम्यान, राज्य सरकारने POSH कायद्यांतर्गत चार सदस्यांची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे. वरिष्ठ IAS अधिकारी काकरला उषा या समितीच्या अध्यक्ष आहेत. 60 दिवसांत अहवाल देण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.