Monsoon Session : मोठी बातमी! 'या' राज्याचे नाव बदलणार, आज संसदेत विधेयक सादर होणार

Parliament Monsoon Session Kerala News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून गदारोळाची शक्यता आहे. केरळच्या नावातील बदलाचे विधेयक, FCRA दुरुस्ती आणि इतर महत्त्वाच्या विधेयकांवरून सरकार-विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता.
Parliament Monsoon Session: Student Issue, Kerala Name Change Bill & FCRA Bill
Parliament Monsoon Session: Student Issue, Kerala Name Change Bill & FCRA BillSaam Tv
Published On
Summary
  • विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून आज संसदेत पुन्हा गदारोळ

  • केरळच्या नावात बदल करण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत मांडले जाणार

  • अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी विरोधकांची मागणी

  • FCRA दुरुस्ती विधेयकाला काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय

Kerala Name Change Bill Parliament Monsoon Session संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजात पुन्हा एकदा जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. तसेच एका मोठ्या राज्याचं नाव बदलण्याची शक्यता आहे.

केरळच्या नावात बदल

केंद्र सरकारकडून आज लोकसभेत काही महत्त्वाची विधेयके मांडण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये केरळच्या नावात बदल करण्यासंदर्भातील विधेयकाचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाशी संबंधित कायद्यात सुधारणा करणारे विधेयकही लोकसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आजचे कामकाज राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

Parliament Monsoon Session: Student Issue, Kerala Name Change Bill & FCRA Bill
Back Pain : रात्री अंथरुणावर झोपल्यावर पाठदुखी होते? 'या' आजरांची असू शकतात गंभीर लक्षणे

FCRA दुरुस्ती विधेयकाला विरोध

काँग्रेसने FCRA दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या विधेयकावरूनही सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून या मुद्द्यावर संसदेत सरकारला जाब विचारला जाणार आहे. दुसरीकडे, राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने एका महत्त्वाच्या विधेयकाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील आजचे कामकाज गदारोळ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी रंगण्याची शक्यता आहे. सरकार महत्त्वाची विधेयके चर्चेतून पुढे नेण्यात यशस्वी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Parliament Monsoon Session: Student Issue, Kerala Name Change Bill & FCRA Bill
Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस ठाम

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले की, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईला १३ दिवस उलटले आहेत, पण गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप कोणतच स्पष्टीकरण दिलेलं नाही. मुलांवर लाठीचार्ज आणि पेलेट गनचा वापर केल्याबद्दल जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे म्हणत त्यांनी एक्स (X) वर पोस्ट केली. काँग्रेस नेते म्हणाले की, गृहमंत्री यांना संसदेत याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागण्याऐवजी "क्षमा" वाटण्याबद्दल बोलत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com