Viral Video: जळत्या चितेवर भाजल्या भाकऱ्या, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा उडाला थरकाप

Viral Shocking Video News: सोशल मीडियात एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक मुलगा जळत्या चितेवर तवा ठेवून भाकऱ्या भाजत आहे. हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं, तर काहींचा थरकाप उडाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv News
Published On

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी करतात. तर काही जण कल्पनेच्या पलीकडे अशी काही गोष्ट करतात, जे पाहून अनेकांचा थरकाप उडतो. सोशल मीडियात एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक मुलगा जळत्या चितेवर तवा ठेवून भाकऱ्या भाजत आहे. हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ स्मशान भूमीतील आहे. जिथे तरूणानं केलेलं कृत्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडिओमध्ये राख झालेली चिता दिसत आहे. या चितेवर थोडी आग अजूनही धगधगत आहे. नंतर एक तरूण राहत असलेल्या तंबूतून बाहेर येतो आणि चितेवर तवा ठेवतो. नंतर भाकऱ्या थापत एक तरूण चितेजवळ पोहोचतो, आणि तयार भाकरी तव्यावर पसरवतो. धगधगत्या चितेवर जळणाऱ्या आगीवर तरूण भाकऱ्या भाजून घेतो.

Viral Video
Viral Video : आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का? लोकलमध्ये तरुणीने 'गवळण' गायली, प्रवाशांनीही धरला ताल

भाकऱ्या भाजून घेत असताना नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भाकऱ्या भाजून घेतल्यानंतर तरूण तयार केलेलं स्वयंपाक गरम करून घेतो. विशेष म्हणजे हा तरूण स्मशानभूमि जवळच असणाऱ्या तंबूत राहतो. त्यामुळे तरूणाला स्मशानभूमि जवळ राहताना भिती वाटत नाही का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तर काहींनी तरूण आणि व्हिडिओला ट्रोल केलं आहे.

Viral Video
Viral Video: शाहरुख खान सोबत 'छोटा पाहुणा', सुट्टीनंतर मुंबईत परतताना सुंदर क्षण, पाहा व्हायरल VIDEO

हा भयानक व्हिडिओ इन्सटाग्रामवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तरूण जळत्या चितेवर भाकऱ्या भाजत असून, हा थरार पाहून नेटकरी स्तब्ध झाले आहे. एका युजरनं कमेंट करत, 'याला म्हणतात इतरांच्या चितेवर भाकऱ्या भाजने'. तर दुसऱ्यानं 'तो कदाचित तंत्रक्रिया करीत असेल.' सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, अनेकांनी ट्रोल केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com